अश्विनी बिद्रे हत्याकांडात १३९ साक्षीदार, पनवेल न्यायालयात यादी सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 04:34 PM2019-09-24T16:34:16+5:302019-09-24T16:37:21+5:30
साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी पनवेल न्यायालयात सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि रायगडचे अॅड. संतोष पवार यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांच्यासमोर १३९ साक्षीदारांची यादी सादर केली. ३० सप्टेंबरला बिद्रे हत्याकांडातील सर्व मुद्देमाल हजर केला जाणार आहे.
कोल्हापूर : साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी पनवेल न्यायालयात सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि रायगडचे अॅड. संतोष पवार यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांच्यासमोर १३९ साक्षीदारांची यादी सादर केली. ३० सप्टेंबरला बिद्रे हत्याकांडातील सर्व मुद्देमाल हजर केला जाणार आहे.
बिद्रे हत्या प्रकरणाची पनवेल न्यायालयात न्यायाधीश अस्मर यांच्यासमोर सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील अॅड. घरत आणि अॅड. पवार यांनी युक्तिवाद करून बिद्रे हत्याकांडातील १३९ साक्षीदारांची यादी सादर केली.
संशयित आरोपी अभय कुरुंदकर, त्याचा मित्र राजेश पाटील, महेश फळणीकर, कुंदन भंडारी न्यायालयात हजर होते. कुरुंदकर याला बेड्या घातल्या नव्हत्या. अन्य तिघांना बेड्या घातल्या होत्या. न्यायालय आवारातच तो पत्नी, मुलासोबत बोलत बसला होता. आरोपीचे वकील अॅड. प्रसाद पाटील, अॅड. भानुशाली उपस्थित होते.
बिद्रे हत्याकांडातील सर्व संशयित आरोपी बाहेर उभे होते. मी न्यायालयात गेल्यावर मला बघून पोलिसांनी त्यांना जेलरूममध्ये ठेवलं.
- राजकुमार गोरे,
मृत अश्विनी बिद्रेचे पती