चंदगड नगरपंचायतीला ५ कोटींचा विकासनिधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:25 AM2021-05-13T04:25:06+5:302021-05-13T04:25:06+5:30

चंदगड : चंदगड शहराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेतून ५ कोटींचा निधी मंजूर झाल्याची ...

5 crore development fund sanctioned to Chandgad Nagar Panchayat | चंदगड नगरपंचायतीला ५ कोटींचा विकासनिधी मंजूर

चंदगड नगरपंचायतीला ५ कोटींचा विकासनिधी मंजूर

Next

चंदगड :

चंदगड शहराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेतून ५ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याकामी उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकार्य लाभले.

काणेकर म्हणाल्या, शहरातील एकूण ३७ कामांसाठी हा ५ कोटींचा निधी वापरण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल. सद्य:स्थितीत शहरामध्ये शिवशक्ती स्थळाचे काम सुरू आहे. त्याचे सुशोभिकरण व रोषणाईसाठी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याठिकाणी ५ हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत.

संभाजी चौकात महिलांसाठी सुलभ शौचालय बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २० लाखांचा निधी उपलब्ध झाला. मदरसा अरेबिया कासीलूम उलूम येथे सभागृह व शौचालय बांधकामासाठी २० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

लिंगायत समाज स्मशानभूमीच्या संरक्षक भिंत बांधकामासाठी २० लाख रुपये, तर देव म्हारतळ संरक्षक भिंतीसाठी १० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. रामदेव गल्ली व प्रभाग क्रमांक आठमधील दत्तू कांबळे ते प्रशांत अनगुडे यांच्या घरापर्यंतची गटर अंडरग्राऊंड करण्यात येणार आहे.

याशिवाय प्रत्येक प्रभागातील रस्ते व गटर बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी दर्जेदार कामे करून घ्यावीत, असे आवाहनही त्यानी केले.

याकामी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री एकनाथ शिंदे व नगरसेवकांचे सहकार्य लाभले. यावेळी पं. स. सदस्य दयानंद काणेकर, 'संगायो'चे अध्यक्ष प्रवीण वांटगी, संजय चंदगडकर, महेश वणकुंद्रे, विनायक काणेकर आदी उपस्थित होते.

-----------------------

* प्राची काणेकर : १२०५२०२१-गड-०४

Web Title: 5 crore development fund sanctioned to Chandgad Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.