शिरोळ तालुक्याला ५ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:22 AM2021-05-01T04:22:25+5:302021-05-01T04:22:25+5:30

जयसिंगपूर : शासनाच्या विविध योजनेमधून शिरोळ तालुक्यातील विविध गावामधील विकास कामांसाठी ५ कोटी १८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. ...

5 crore fund to Shirol taluka | शिरोळ तालुक्याला ५ कोटींचा निधी

शिरोळ तालुक्याला ५ कोटींचा निधी

Next

जयसिंगपूर : शासनाच्या विविध योजनेमधून शिरोळ तालुक्यातील विविध गावामधील विकास कामांसाठी ५ कोटी १८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासात आणखी भर पडणार आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

जनसुविधा योजनेमधून १ कोटी ५० लाख, नागरी सुविधा योजनेंतर्गत १ कोटी, क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेमधून १ कोटी, अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास योजनेंतर्गत १ कोटी, तसेच शिरोळ तालुक्यातील अंगणवाडी इमारत व उर्दू शाळा इमारत बांधकामासाठी ६८ लाखांचा निधी असा एकूण ५ कोटी १८ लाखांचा निधी मिळाला आहे. विविध योजनेमधील या निधीचा विनियोग सर्व गावातील घटकांना मिळणार आहे. या विकास कामांमुळे तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही मंत्री यड्रावकर यांनी यांनी सांगितले.

Web Title: 5 crore fund to Shirol taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.