जिल्ह्यात ५ हजारांवर उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:34 AM2020-12-30T04:34:05+5:302020-12-30T04:34:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी बारा तालुक्यांतून तब्बल ५ हजार ३२८ उमेदवारी अर्ज भरण्यात ...

5 thousand candidature applications filed in the district | जिल्ह्यात ५ हजारांवर उमेदवारी अर्ज दाखल

जिल्ह्यात ५ हजारांवर उमेदवारी अर्ज दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी बारा तालुक्यांतून तब्बल ५ हजार ३२८ उमेदवारी अर्ज भरण्यात आले. इतक्या मोठ्या संख्येने अर्ज भरल्यानंतर आता गावागावात राजकारणातील इर्षा वाढली आहे. चार दिवसांत ८ हजार ८९१ अर्ज आले असून, अर्ज भरण्याचा आज बुधवारी अखेरचा दिवस आहे.

जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून, यंदा जिल्हयातील १२ तालुक्यांतील ४३३ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहेत. सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी ३ हजार ३७, तर मंगळवारी ५ हजार ३२८ उमेदवारी अर्ज तालुक्याच्या ठिकाणी सादर झाले. ऑनलाईन अर्ज भरण्यात व जातपडताळणीसाठी अर्ज सादर करण्यात अडचणी येत असल्याने आता पारंपरिक पद्धतीने अर्ज देण्याची मुभा राज्य निवडणूक आयोगाने दिल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय अर्ज भरण्यासाठी दोन तास वाढविण्यात आल्याने आज बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू राहील.

--

उमेदवारी अर्ज

तालुका : अर्ज भरलेले व्यक्ती : अर्जांची संख्या

शाहूवाडी : २९४ : २९४

पन्हाळा : ४३३ : ४३६

हातकणंगले : २६३ : २६७

शिरोळ : ५४५ : ५४६

करवीर : ९०४ : ९२७

गगनबावडा : ५० : ५०

राधानगरी : १७२ : १७३

कागल : ११४६ : ११४६

भुदरगड : ४३५ : ४५४

आजरा : २२४ : २२५

गडहिंग्लज : ४३८ : ४६३

चंदगड : ३३९ : ३४७

एकूण : ५ हजार २४३ : ५ हजार ३२८

---

Web Title: 5 thousand candidature applications filed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.