शंकर पाटील यांच्याकडून पंचगंगा स्मशानभूमीला ५ टन लाकूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:28 AM2021-05-25T04:28:41+5:302021-05-25T04:28:41+5:30

करंजफेण : जनसुराज्य पक्षाचे कोतोली जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील यांनी कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीसाठी ५ टन जळाऊ लाकूड दिले. ...

5 tons of wood from Shankar Patil to Panchganga cemetery | शंकर पाटील यांच्याकडून पंचगंगा स्मशानभूमीला ५ टन लाकूड

शंकर पाटील यांच्याकडून पंचगंगा स्मशानभूमीला ५ टन लाकूड

googlenewsNext

करंजफेण : जनसुराज्य पक्षाचे कोतोली जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील यांनी कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीसाठी ५ टन जळाऊ लाकूड दिले. स्वत:च्या ट्रॅक्टरमधून त्यांनी हे लाकूड स्मशानभूमीत पोहोच करून सामाजिक बांधीलकी जपली. मूळचे कोतोली येथील शंकर पाटील यांचा लाकडाचा व्यवसाय आहे.

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले पाटील परिसरातील गरजूंना नेहमी मदत करतात. मागील वर्षी कोतोली परिसरातील अनेक कोरोना रुग्णांना रोज मोफत नाष्टा व जेवण दिले होते. कोतोली परिसरातील वाडीवस्तीवरील रुग्णांची होणारी गैरसोय पाहून त्यांनी स्वखर्चाने रुग्णवाहिका खरेदी केली असून लवकरच लोकांच्या सेवेत ती उपलब्ध होणार आहे. रुग्णवाहिकेची सेवाही विनामोबदला देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी मंडल अधिकारी सतीश ढेंगे, उपसरपंच राजेंद्र लव्हटे, पोलीस पाटील मोरारजी सातपुते, दलित महासंघाचे संतोष सूर्यवंशी, सुरेश पोवार,महादेव पोवार,सर्जेराव आंगठेकर उपस्थित होते.

फोटो : २४०५२०२१-कोल- लाकूड मदत

कोतोली (ता.पन्हाळा) येथील जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील यांनी कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीसाठी ५ टन जळाऊ लाकूड स्वखर्चाने पाठवून दिले.

Web Title: 5 tons of wood from Shankar Patil to Panchganga cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.