कृषिपंपावरील थकीत वीज बिल एकरकमी भरल्यास ५० टक्के सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:26 AM2021-03-10T04:26:06+5:302021-03-10T04:26:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कबनूर : शेती पंपावरील थकीत वीज बिल शेतकऱ्यांनी एकरकमी भरल्यास शेतकऱ्यांना ५० टक्के सूट दिली जाईल. ...

50% discount on one-time payment of overdue electricity bill on agricultural pumps | कृषिपंपावरील थकीत वीज बिल एकरकमी भरल्यास ५० टक्के सूट

कृषिपंपावरील थकीत वीज बिल एकरकमी भरल्यास ५० टक्के सूट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कबनूर : शेती पंपावरील थकीत वीज बिल शेतकऱ्यांनी एकरकमी भरल्यास शेतकऱ्यांना ५० टक्के सूट दिली जाईल. तरी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर वीज पंपावरील थकीत वीज बिल भरून महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन धुमाळ यांनी केले.

येथील श्री विठ्ठल मंदिर सांस्कृतिक भवनात महावितरण कंपनी शाखेच्या वतीने शेती वीज पंप बिल व इतर तक्रार निवारणासाठी शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीत शेती पंपावरील वीज बिल पूर्णपणे भरलेल्या पंधरा शेतकऱ्यांना प्रमाणपत्र व नाहरकत दाखला देण्यात आला. यावेळी सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधीर पाटील, जि.प. सदस्या विजया पाटील, रेश्मा सनदी, महादेव पाटील, अप्पासाहेब पाटील, पिरगोंडा लिगाडे, अजित खुडे, पांडुरंग वाकरेकर आदी उपस्थित होते. महावीर लिगाडे यांनी आभार मानले.

Web Title: 50% discount on one-time payment of overdue electricity bill on agricultural pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.