शेतीसाठी ५० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:05 AM2017-12-04T00:05:18+5:302017-12-04T00:07:05+5:30

50 MW Solar Power Project for Agriculture | शेतीसाठी ५० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प

शेतीसाठी ५० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प

googlenewsNext

प्रवीण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकºयांना शेतीसाठी स्वस्त दरात आणि दिवसाही पुरेशी वीज मिळावी यासाठी राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ५० मेगावॅटचे ‘सौर ऊर्जा प्रकल्प’ उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ‘महानिर्मिती’कडून १० शासकीय जागांची पाहणी करून त्याचा प्रस्ताव सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे. सहा महिन्यांत या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
राज्यातील शेतकरी विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी सौरऊर्जानिर्मित वीज फिडरला जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्टÑ सरकारने घेतला आहे. शेतकºयांना विजेची गरज लक्षात घेऊन सुरुवातीला शेतकºयांना सौर पंप देण्याची योजना होती; परंतु हे पंप वितरित करण्याला मर्यादा असल्याने कृषीपंपांना वीजपुरवठा करणाºया ‘महावितरण’च्या सबस्टेशनच्या फिडरनाच सौरऊर्जेच्या माध्यमातून जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या माध्यमातून ही वीज दिवसा सौरऊर्जेद्वारे व रात्री आवश्यकतेनुसार ‘महावितरण’द्वारे मिळू शकणार आहे. यासाठी सबस्टेशनच्या परिसरातच किंवा आसपासच्या परिसरातच सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यात नागपूर, औरंगाबाद, पुणे व कोल्हापूर या विभागात ३०० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ५० मेगावॅटचे प्रकल्प उभारले जाणार आहेत.
२ मेगावॅटच्या एका प्रकल्पासाठी किमान १० एकर जागा लागणार आहे. ज्याप्रमाणे जागा उपलब्ध असेल त्याप्रमाणे, २, ५, १० मेगावॅटचे मिळून ५० मेगावॅटपर्यंतचे प्रकल्प होणार आहेत. यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील १० सरकारी जागांची पाहणी महावितरण, महाऊर्जा व महानिर्मितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या जागांबाबतचा सर्व माहिती असणारा अहवाल मुंबईतील महानिर्मिती व महाऊर्जाच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या कार्यालयाकडून पहिल्या टप्प्यात ५० मेगावॅटच्या प्रकल्पांची एकत्रित टेंडर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या महिन्याभरात टेंडर प्रक्रियेचे काम चालू होईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खºया अर्थाने प्रत्यक्ष कामाला सहा महिन्यांनंतर सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

शेतकºयांना मिळेल १२ तास वीज
‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेंतर्गत उभारण्यात येणाºया सौरऊर्जा प्रकल्पांमुळे शेतकºयांना १२ तास वीज मिळू शकणार आहे. सध्या वीजनिर्मितीचा एक युनिटचा दर साधारणपणे साडेसहा रुपये आहे.
सौर ऊर्जानिर्मितीचा प्रति युनिट खर्च हा साधारणपणे ३ ते ३.२५ रुपये आहे. त्यामुळे निश्चितच शेतकºयांना स्वस्तात वीज मिळणार आहे.

Web Title: 50 MW Solar Power Project for Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी