सुटातर्फे जि.प.ला ५० ऑक्सिजन फ्लो मीटर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:28 AM2021-06-09T04:28:51+5:302021-06-09T04:28:51+5:30
कोल्हापूर : ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या तसेच ऑक्सिजनच्या सिलिंडरचा भेडसावणारा प्रश्न याची दखल घेत शिवाजी विद्यापीठ ...
कोल्हापूर : ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या तसेच ऑक्सिजनच्या सिलिंडरचा भेडसावणारा प्रश्न याची दखल घेत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शिक्षक संघाच्या (सुटा)वतीने सोमवारी जिल्हा परिषदेला ५० ऑक्सिजन फ्लो मीटर्स प्रदान करण्यात आले.
सुटाने येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून मानवतेच्या भावनेतून तातडीने पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन सुमारे दीड लाख रुपये किमतीची ही ५० ऑक्सिजन फ्लो मीटर्स खरेदी करून जिल्हा परिषदेला देण्याचा निर्णय घेतला. ही उपकरणे कोल्हापूरमध्ये उपलब्ध नसल्याने दिल्लीवरून मागविण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती हंबीरराव पाटील, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. यु. जी. कुंभार , माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. फारूक देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी ‘सुटा’चे प्रमुख कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील, कार्यवाह (कोल्हापूर) डॉ. डी. आर. भोसले, कार्यकारिणी सदस्य प्रा. सयाजी पाटील व प्रा. सुनीता अमृतसागर उपस्थित होते. याकामी सुटाचे प्रमुख समन्वयक प्रा. एस. जी. पाटील, प्रा. सुधाकर मानकर, प्रा टी. व्ही. स्वामी, प्रा. ए. पी. देसाई यांचे मार्गदर्शन तर डॉ. आर. के. चव्हाण, डॉ. अरुण पाटील, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. अरुण शिंदे, डॉ. यु. ए. वाघमारे यांचे सहकार्य लाभले.
०७०६२०२१ कोल झेडपी ०१
‘सुटा’तर्फे सोमवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला ५० ऑक्सिजन फ्लो मीटर्स देण्यात आली. आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील, डॉ. उषादेवी कुंभार, डॉ. फारूक देसाई यांनी ती स्वीकारली. यावेळी डावीकडून डॉ. सुनीता अमृतसागर, प्रा. सयाजी पाटील, कार्यवाह डॉ. डी. आर. भोसले, प्रमुख कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील उपस्थित होते.