प्रवासी वाहनाची योग्यता नसल्यास रोज ५० रुपये दंड, परिवहन आयुक्तांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 04:26 PM2024-05-25T16:26:29+5:302024-05-25T16:28:38+5:30
वसुलीवरील स्थगिती उच्च न्यायालयाने उठविली
सतीश पाटील
कोल्हापूर : प्रवासी वाहनांना (फिटनेस) योग्यता प्रमाणपत्र नसेल, तर दररोज ५० रुपये दंड आकारणी केली जाणार आहे. या निर्णयावर गेल्या ८ वर्षांपासून असलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठविली आहे. रिक्षा, टॅक्सी, बससह इतर प्रवासी वाहनांना आता वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची (फिटनेस) मुदत संपताच, तत्काळ त्याचे नूतनीकरण करून घ्यावे लागणार आहे, अन्यथा संबंधित वाहन मालकाला प्रति दिन ५० रुपयांचा दंड भरावा लागेल.
वेळेत दंड न भरल्यास वाहनधारकांना आता आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे, असा निर्णय १७ मे, २०२४ ला निघाला आहे. २०१७ पासून ज्या वाहनांची (फिटनेस) योग्यता प्रमाणपत्र संपले आहे, त्यांना त्या सर्व वर्षांची दंड आकारणी भरावी लागणार आहे.
केंद्र सरकारच्या परिवहन विभागाने २०१७ मध्ये व्यावसायिक संवर्गातील (ट्रान्स्पोर्ट) रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक इत्यादी प्रकारची सर्व वाहनांचे पासिंग उशिरा केल्यास प्रतिदिवस ५० रुपये असा दंड आकारण्याबाबत निर्णय घेतला होता. याबाबत मुंबई बस असोसिएशन आणि पुण्यातील रिक्षा संघटनांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याप्रमाणे, सन २०१७ ते १८ प्रवासी मे, २०२४ पर्यंत या निर्णयाला स्थगिती वाहनधारकांना होती. मात्र, आता या निर्णयावरील बसणार फटका स्थगिती हटल्याने राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
रिक्षा, टॅक्सी, बससह इतर प्रवासी वाहनांना आता वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची (फिटनेस) मुदत संपताच तत्काळ त्याचे नूतनीकरण करून घ्यावे लागणार आहे, अन्यथा संबंधित वाहन मालकाला प्रति दिन ५० रुपयांचा दंड भरावा लागेल, पण आम्ही या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. - बाबा शिंदे, अध्यक्ष, राज्य माल आणि प्रवासी वाहतूक संघटना)
प्रवासी वाहनांना मालवाहतूक वाहनांचा (फिटनेस) योग्यता प्रमाणपत्र संपले असेल आणि ज्यांनी नूतनीकरण केले नसेल, अशांना प्रतिदिनी ५० रुपये दंड आकारणी केली जाणार आहे. हा नियम जुनाच आहे, याबाबत सन २०१७ पासून न्यायालयात प्रलंबित होता. याचा १७ मेला निकाल लागला आहे. - रोहित काटकर, सहायक प्रादेशिक अधिकारी, कोल्हापूर.