नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:21 AM2021-02-08T04:21:31+5:302021-02-08T04:21:31+5:30

चंदगड : राज्य शासनाकडून दोन लाख रुपयांवरील व नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान लवकरच देण्याचा प्रयत्न करू, ...

50 thousand grant to farmers who repay regular loans | नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान

googlenewsNext

चंदगड : राज्य शासनाकडून दोन लाख रुपयांवरील व नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान लवकरच देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. अडकूर (ता. चंदगड) येथे सुरेखा फॅमिली रेस्टॉरंट उद्घाटनप्रसंगी आले असता शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी ही ग्वाही दिली.

मुश्रीफ म्हणाले, कोरोनानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून, या वर्षभरात विकासकामांना प्राधान्य देऊ. चंदगड मतदारसंघातील पाटणे फाटा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरला मंजुरी मिळाली आहे. त्याला एमआयडीसीची चार एकर जागाही उपलब्ध झाली आहे. चंदगड मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी अडकूर गावच्या रवळनाथ मंदिरासाठी अभय देसाई यांनी ‘क’ वर्ग दर्जा मिळावा व विकासासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. त्याला त्वरित मान्यता देत मुश्रीफ यांनी २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा केली.

यावेळी आमदार राजेश पाटील म्हणाले, जसा कागलचा विकास होत आहे, तसाच चंदगडच्या विकासाकडे मुश्रीफ यांनी लक्ष द्यावे. या मतदारसंघातील तरुणांमध्ये कौशल्ये आहेत; मात्र त्यांना रोजगाराच्या संधीसाठी बाहेर जावे लागते. या परिसरात तीन एमआयडीसी असून, त्या ठिकाणी रोजगार निर्मिती व्हावी, मोठे उद्योगधंदे यावेत यासाठी मुश्रीफ यांनी प्रयत्न करावेत. अभय देसाई यांनी आभार मानले.

--------------------------

फोटो ओळी : अडकूर (ता. चंदगड) येथे सुरेखा फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार राजेश पाटील, आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०७०२२०२१-गड-०२

Web Title: 50 thousand grant to farmers who repay regular loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.