इचलकरंजीत ५२ पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:27 AM2021-05-20T04:27:35+5:302021-05-20T04:27:35+5:30

इचलकरंजी : येथील विविध ३५ ठिकाणी ५२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान मथुरा हायस्कूलजवळील ५० वर्षीय पुरूष व ...

52 positive in Ichalkaranji; Two deaths | इचलकरंजीत ५२ पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

इचलकरंजीत ५२ पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

Next

इचलकरंजी : येथील विविध ३५ ठिकाणी ५२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान मथुरा हायस्कूलजवळील ५० वर्षीय पुरूष व महालक्ष्मीनगर येथील ५९ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये जवाहरनगर ४, गावभाग, दातार मळा, कृष्णानगर येथील प्रत्येकी ३, नदीवेस नाका, दत्तनगर, केटकाळे गल्ली, सेवाभारती हॉस्पिटलजवळ, कलानगर, कमला-नेहरू सोसायटी, खंजिरे मळा, शहापूर येथील प्रत्येकी २, कोल्हापूर नाका, जाधव मळा, लालनगर, पंचवटी टॉकीजजवळ, शाहूनगर, वेताळ पेठ, सोलगे मळा, निलगिरी बागेजवळ, पुजारी मळा, भारतमाता हौसिंग सोसायटी, संत मळा, महात्मा फुले हौसिंग सोसायटी, आवळे गल्ली, अनुबाई कन्या शाळेजवळ, चिनार हौसिंग सोसायटी, टाकवडे वेस, महालक्ष्मीनगर, मुरदंडे मळा, गुरूकन्नननगर, कारंडे मळा, निशिगंधा हौसिंग सोसायटी, डेक्कन रोड, मंगलधाम येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत सहा हजार १२२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पाच हजार ३६५ जण बरे झाले असून, ४६३ जण उपचार घेत आहेत. २९४ वर मृत्यूसंख्या पोहोचली आहे.

Web Title: 52 positive in Ichalkaranji; Two deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.