करवीरमध्ये ५३ टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:16 AM2021-07-08T04:16:14+5:302021-07-08T04:16:14+5:30

कोपार्डे : करवीर तालुक्यात ४५ वर्षांवरील वयोगटातील जनतेपैकी केवळ ५३ टक्के जनतेला पहिला डोस मिळला आहे, तर ...

53% vaccination in Karveer | करवीरमध्ये ५३ टक्के लसीकरण

करवीरमध्ये ५३ टक्के लसीकरण

googlenewsNext

कोपार्डे : करवीर तालुक्यात ४५ वर्षांवरील वयोगटातील जनतेपैकी केवळ ५३ टक्के जनतेला पहिला डोस मिळला आहे, तर ४४ वर्षांखालील जनता लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. लसीकरण केंद्रांवर लस आल्याचे समजताच ती मिळवण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे. यातून वादावादीचे प्रकार दररोज घडत आहेत.

करवीर तालुक्यात शहर, उपनगर व ग्रामीण भागाचा समावेश आहे. तालुक्याची एकूण लोकसंख्या ५ लाख ४९ हजार आहे. ४१ टक्के लोकसंख्या १८ ते ४४ वर्षांपर्यंतची आहे; पण या वयोगटातील २ लाख २० हजार ९९० लोकसंख्येपैकी केवळ २ हजार ३० लोकांनाच लस मिळाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या वयोगटातील कोरोनाबाधितांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे या वयोगटातील जनता लसीकरणासाठी गर्दी करत आहे

लसीकरणात ४५ वर्षांवरील जनतेला प्राधान्य देण्यात आले होते. ४५ ते ६० च्या वयोगटातील १ लाख २८ हजार ३५१ लोक संख्या आहे. पैकी ६७ हजार १७० लोकसंख्येला पहिल्या डोसचे लसीकरण झाले आहे. तर ६० वर्षांवरील ७४ हजार ५९८ लोकसंख्येपैकी ४० हजार लसीकरण झाले आहे.

४५ वर्षांवरील लोकसंख्येच्या केवळ ५३ टक्के लोकसंख्येचे लसीकरण करवीर तालुक्यात झाले आहे. १८ ते ४४ वयोगटातील २ लाख १८ हजार ९६० लोकसंख्या तर, ४५ वयोगटावरील वरील ९५ हजार २७९ लोकसंख्या अशी ३ लाग १४ हजार २३९ लोकसंख्या आजही कोरोना लसीकरणापासून वंचित आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने लोकांच्यातून लसीकरणासाठी झुंबड उडत आहे.

चौकट : करवीर तालुक्यातील कोरोना लसीकरणाचा लेखा-जोखा

एकूण लोकसंख्या -५ लाख ४९ हजार

वयोगट -- १८ ते ४४ पात्र -- २ लाख २० हजार ९९० पहिला डोस -- २ हजार ३०

एकही डोस न मिळालेले --२ लाख १८ हजार ९६०

वयोगट -- ४५ ते ६० पात्र -- १ लाख २८ हजार ३५१ पहिला डोस -- ६७ हजार १७० एकही डोस न मिळालेले -- ६१ हजार १८१

वयोगट ६० वर्षांवरील पात्र -- ७४ हजार ५९८ पहिला डोस -- ४० हजार ५११ एकही डोस न मिळालेले -- ३४ हजार १४७

फोटो

: ०७ करवीर लसीकरण

कोपार्डे (ता. करवीर) येथे लसीकरणासाठी एकच झुंबड उडाली होती.

Web Title: 53% vaccination in Karveer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.