५३३ गरजूंना संजय गांधी योजनेतून पुन्हा पेन्शन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:58+5:302021-06-22T04:17:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : संजय गांधी निराधार योजनेमधून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ५३३ पात्र असलेल्यांना पुन्हा पेन्शन सुरू करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : संजय गांधी निराधार योजनेमधून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ५३३ पात्र असलेल्यांना पुन्हा पेन्शन सुरू करण्यात आली. यापुढे सर्व गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल, असे आश्वासन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले
अजिंक्यतारा कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, वर्षभरामध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष, सदस्य नियुक्ती केले. समिती सदस्यांशी सतत संपर्क ठेवत गरजू आणि पात्र लाभार्थींना लाभ दिला. जानेवारीत १७३, फेब्रुवारीत १५५, मार्चमध्ये ०५ लाभार्थ्यांना पुन्हा पेन्शन सुरू करण्यात आली आहे.
संजय गांधी योजना समिती दक्षिणचे अध्यक्ष संजय पाटील यांचेही भाषण झाले. यावेळी समिती सदस्य संतोष कांबळे, शिवाजी राजिगरे, संगिता चक्रे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
फोटो ओळी : २१०६२०२१- कोल - मंजुरीपत्र वाटप
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी संजय पाटील, संतोष कांबळे, शिवाजी राजिगरे, संगीता चक्रे उपस्थित होते.