५४ हजार जणांनी कोरोनाला हरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:27 AM2021-04-28T04:27:31+5:302021-04-28T04:27:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ५४ हजार जणांनी कोराेनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोना झाला म्हणून ...

54,000 lost to Corona | ५४ हजार जणांनी कोरोनाला हरविले

५४ हजार जणांनी कोरोनाला हरविले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ५४ हजार जणांनी कोराेनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोना झाला म्हणून घाबरून जाण्यापेक्षा वैद्यकीय सल्ला, सकारात्मक वृत्ती आणि पोषक आहाराच्या माध्यमातून कोरोनावर मात करता येते हे या सर्वांनी दाखवून दिले आहे.

गतवर्षी कोरोना संसर्गाची सुरुवात झाली आणि ज्या आजाराबाबत कोणालाच माहिती नाही त्याबद्दल मोठे भय निर्माण झाले. परंतु, नंतरच्या काळात हळूहळू माहिती मिळत गेली. कोणत्या औषधांमुळे रुग्ण बरा होऊ शकतो याची स्पष्टता आली. मार्च २०२० पासून २६ एप्रिल २०२१ पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ६३९१७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी तब्बल ५४०५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. २१११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर मंगळवार अखेर ७७४९ सक्रिय रुग्ण आहेत.

चौकट

जिल्ह्याची लोकसंख्या - ४१ लाख ४७ हजार ५०६

कोरोनाचा संशय आल्याने स्वॅब तपासणाऱ्यांची संख्या - ३ लाख ९० हजार

कोरोना निगेटिव्ह आलेली संख्या - ५४ हजार ०५७

वर्षभरात कोरोनाची लागण झालेली संख्या - ६३ हजार ९१७

कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या - ३ लाख ३५ हजार ९४३

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - ७ हजार ७४९

२) कोरोनाला आम्ही दररोज हरवतोय

वार कोरोनामुक्त रुग्ण

सोमवार १९ एप्रिल २४३

मंगळवार २८९

बुधवार ३४५

गुरुवार २८२

शुक्रवार २७८

शनिवार ३५७

रविवार २९५

चौकट

घाबरू नका, आम्हीही हरविले !

कोट

गतवर्षी ऑगस्ट महिन्यात मी, मुलगा पॉझिटिव्ह आलो. गडहिंग्लज येथेच शेंद्री माळावरील कोविड सेंटरवर मला आणि मुलाला दाखल करण्यात आले. माझे वय ७४ असल्याने जरा ताण आला होता. अशातच पत्नीची तब्येत बिघडल्याने त्यांना कोल्हापूरला दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे उपचार, तेथील आहार आणि मुळात घरासाठी मला जगले पाहिजे असा निश्चय मी केला. परंतु, अशातच माझ्या पत्नीचे निधन झाले. परंतु, त्यातूनही मला सावरावेच लागले.

२७०४२०२१ कोल विनोद नाईकवाडी

विनोद नाईकवाडी

माजी उपसभापती, नूल, ता. गडहिंग्लज

कोट

याच महिन्यात मला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्यावेळचे कोरोनाचे वातावरण यामध्ये फरक होता. या आजाराबाबत माहिती मिळाली होती. माझे वय ७१ आाणि मधुमेहाचा त्रास, त्यामुळे थोडी काळजी होती. परंतु, मला यातून बरे व्हायचे आहे अशी भावना मी पहिल्यापासून ठेवली. नामस्मरण करत राहिलो. डॉक्टरांच्या सर्व उपचारांकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले आणि बरा झालो.

सुभाष कुलकर्णी, मंगळवार पेठ, कोल्हापूर

कोट

हिंमत ठेवा, आनंदी राहा

वर्षानुवर्षे निसर्गाचे चक्र सुरू आहे. त्यामध्ये अशा आपत्ती येतात. त्यामुळे नागरिकांनी कोरोना झाला म्हणून घाबरून उपयोग नाही. त्यामुळेे शरीर उपचारांना साथ देत नाही. ८० टक्क्यांहून अधिक रुग्ण यातून बरे झाले आहेत. आपल्याला याला सामोरेच गेले पाहिजे अशी परिस्थिती आहे. मग त्याला सकारात्मक पद्धतीने सामोरे जायचे असा निश्चय करण्याची गरज आहे. नकारात्मक माहितीवर विश्वास न ठेवता डॉक्टरांच्या उपचारावर विश्वास ठेवला पाहिजे. यानिमित्ताने थोडे चिंतन करण्याची संधी मिळाली आहे असे समजून आनंद आणि समाधान याचे संतुलन राखण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.

डॉ. शुभदा दिवाण, मानसोपचार तज्ज्ञ

Web Title: 54,000 lost to Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.