कोल्हापूर पूर : अलमट्टीतून 540000, कोयनेतून 48893 तर राधानगरीतून 1400 क्युसेक विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:11 PM2019-08-12T13:11:36+5:302019-08-12T13:14:35+5:30

अलमट्टी धरणातून 5 लाख 40 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज सकाळी 8.30 वाजता बंद झाले असून, सध्या धारणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून 48893 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज दिली.

540000 from Almaty, 48893 from Coyne and 1400 cusecs from Radhanagari | कोल्हापूर पूर : अलमट्टीतून 540000, कोयनेतून 48893 तर राधानगरीतून 1400 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर पूर : अलमट्टीतून 540000, कोयनेतून 48893 तर राधानगरीतून 1400 क्युसेक विसर्ग

Next
ठळक मुद्देअलमट्टीतून 540000, कोयनेतून 48893 तर राधानगरीतून 1400 क्युसेक विसर्गकोयना धरणामधून 48893 क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोल्हापूर : अलमट्टी धरणातून 5 लाख 40 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज सकाळी 8.30 वाजता बंद झाले असून, सध्या धारणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून 48893 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज दिली.

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी 7 वाजता 49 फूट असून, एकूण 84 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.21 टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे. कासारी नदीवरील- वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन व यवलूज. तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, क.वाळवे, तुरूंबे व सुळंबी. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे, मांडूकली, असळज, सांगशी व काताळी. वेदगंगा नदीवरील- गारगोटी, निळपण, वाघापूर व शेणगाव बंधारे पाण्याखाली आहेत.

हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हरळे, गजरगाव व दाबीळ. घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, दुंडगे, कामेवाडी व ढोलगरवाडी. शाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली. धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे व पनोरे. असे एकूण 84 बंधारे पाण्याखाली आहेत.

नजिकच्या अलमट्टी धरणात 100.786 टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 102.55 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.27 टीएमसी, वारणा 32.46 टीएमसी, दूधगंगा 24.14 टीएमसी, कासारी 2.66 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.53 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.39, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 49 फूट, सुर्वे 46.11 फूट, रुई 77.9 फूट, इचलकरंजी 76 फूट, तेरवाड 80.10 फूट, शिरोळ 76.7 फूट, नृसिंहवाडी 76.7 फूट, राजापूर 62.1 फूट तर नजीकच्या सांगली 51.2 फूट आणि अंकली 56.9 फूट अशी आहे.

Web Title: 540000 from Almaty, 48893 from Coyne and 1400 cusecs from Radhanagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.