कोल्हापूर जिल्ह्यात 55 अहवाल पॉझीटिव्ह, आजअखेर 948 जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 04:24 PM2020-07-17T16:24:38+5:302020-07-17T16:25:58+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी 10 वाजेपर्यंत 770 प्राप्त अहवालापैकी 684 निगेटिव्ह तर 55 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (दोन अहवाल पाठपुरावा करण्यासाठी आले आहेत.) तर 29 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 1638 पॉझीटिव्हपैकी 948 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 650 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

55 positive reports in Kolhapur district, 948 people discharged till date | कोल्हापूर जिल्ह्यात 55 अहवाल पॉझीटिव्ह, आजअखेर 948 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर जिल्ह्यात 55 अहवाल पॉझीटिव्ह, आजअखेर 948 जणांना डिस्चार्ज

Next
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात 55 अहवाल पॉझीटिव्ह आजअखेर 948 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर  : जिल्ह्यात आज सकाळी 10 वाजेपर्यंत 770 प्राप्त अहवालापैकी 684 निगेटिव्ह तर 55 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (दोन अहवाल पाठपुरावा करण्यासाठी आले आहेत.) तर 29 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 1638 पॉझीटिव्हपैकी 948 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 650 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 55 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड -1, चंदगड-1, गडहिंग्लज -4, हातकणंगले- 6, करवीर-11, पन्हाळा-1, राधानगरी-1, शाहूवाडी-9, शिरोळ-1, नगरपालिका क्षेत्र- 6 व कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
आजरा- 97, भुदरगड- 82, चंदगड- 182, गडहिंग्लज- 139, गगनबावडा- 7, हातकणंगले- 50, कागल- 64, करवीर- 153, पन्हाळा- 58, राधानगरी- 77, शाहूवाडी- 204, शिरोळ- 36, नगरपरिषद क्षेत्र- 250, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-203 असे एकूण 1602 आणि जिल्हा व राज्यातील 36 असे मिळून एकूण 1638 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण 1638 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 948 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 40 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 650 इतकी आहे.

Web Title: 55 positive reports in Kolhapur district, 948 people discharged till date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.