चव्हाणवाडीत एक महिन्यात ५६ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:21 AM2021-05-15T04:21:43+5:302021-05-15T04:21:43+5:30
उत्तूर : चव्हाणवाडी (ता. आजरा) येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात होऊन एक महिना झाला. या एका महिन्यात ५६ कोरोनाबाधित ...
उत्तूर : चव्हाणवाडी (ता. आजरा) येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात होऊन एक महिना झाला. या एका महिन्यात ५६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चव्हाणवाडीकर हतबल झाले आहेत. १५ एप्रिल २०२० रोजी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा रुग्ण सापडला. त्यानंतर रुग्णवाढही सुरूच आहे. संपूर्ण गाव लॉकडाऊन केले. मात्र कोरोनाची साखळी तुटली नाही. रोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे गावात घबराट आहे. प्राथमिक आरोग्यकेंद्र व कोरोना ग्रामसमितीने गावावर विशेष लक्ष ठेवले आहे.
सरपंच पुष्पा बुवा यांच्या परिवारातील सर्व सदस्य कोरोनाबाधित झाले. त्यांच्यावर खासगी व सरकारी रुग्णालयांत उपचार सुरू झाले. मात्र सरपंच यांच्या पतींचा शिवाजी बुवा कोरोना लागण झाल्यानंतर सातव्या दिवशी निधन झाले. शिवाजी बुवा यांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी चुलती रंगूबाई यांचेही निधन झाले. सरपंच पुष्पा बुवा यांच्यावर गारगोटी येथे उपचार सुरू होते. त्यांचे २० दिवसांनी निधन झाले. एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
----------------------
गावासाठी मोठे योगदान
शेतकरी असलेल्या सरपंच पुष्पा पुरी बुवा, पती शिवाजी बुवा यांचे गावासाठी मोठे योगदान होते. त्यांच्याकडे सर्वसामान्याला दानत करण्याची प्रवृती होती. माजी पोलीस निरीक्षक चंद्रकांत पुरी बुवा यांचे ते बंधू होत.
-------------------
* गावकऱ्यांची सावधानता महत्त्वाची
संयमी, शांतताप्रिय गाव म्हणून चव्हाणवाडीकरांकडे पाहिले जाते. कोरोनाने हतबल झाले तरी प्रशासनाच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. निवडणूक बिनविरोध करणाऱ्या आदर्श गावात ग्रामस्थांनी सावधानता पाळून कोरोनाची साखळी तोडली पाहिजे.