राज्यातील ५६ हजार कलाकारांना मिळणार प्रत्येकी ५ हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:28 AM2021-08-12T04:28:43+5:302021-08-12T04:28:43+5:30

जयसिंगपूर : राज्यातील शेकडो लोककलावंत, लोककलाकार यांना कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री ...

56,000 artists in the state will get Rs 5,000 each | राज्यातील ५६ हजार कलाकारांना मिळणार प्रत्येकी ५ हजारांची मदत

राज्यातील ५६ हजार कलाकारांना मिळणार प्रत्येकी ५ हजारांची मदत

Next

जयसिंगपूर : राज्यातील शेकडो लोककलावंत, लोककलाकार यांना कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासमोर कलाकारांनी या अडचणी मांडल्या होत्या. मंत्री यड्रावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर कलाकारांचा हा प्रश्न मांडला होता. यानंतर सरकारने कलाकारांसाठी एकरकमी कोविड दिलासा अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्यमंत्री मंडळासमोर त्वरित आणावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. याबद्दल कलापथक निर्माता असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री यड्रावकर यांचे आभार मानले.

कोल्हापूर कलापथक निर्माता असोसिएशनचे अध्यक्ष मुकुंद सुतार, उपाध्यक्ष शारदा हेलगे, अमर विधाते, रजनी गोरड, श्रीनिवास कुंभार, सेक्रेटरी गुरुप्रसाद कुलकर्णी, बबीता काकडे, गोविंद सुतार यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी सांस्कृतिक कार्य विभागाकडील विषयासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.

राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमावर निर्बंध असल्याने अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी कलाकारांनी केली होती. या मागणीबाबत बैठकीत चर्चा झाली. राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. याप्रश्नी मंत्री डॉ. यड्रावकर यांनी पाठपुरावा केल्याने कलापथकाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो - १००८२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे कलाकारांच्यावतीने राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा सत्कार करुन आभार व्यक्त करण्यात आले.

Web Title: 56,000 artists in the state will get Rs 5,000 each

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.