जर्मन, पितळ, तांब्याच्या मोड देवघेवीतून ५७ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:39 AM2020-12-16T04:39:52+5:302020-12-16T04:39:52+5:30
सांगली फाटा येथे प्रवीण ताराचंद पारेख यांची पारेख मेटल व साई मेटल या नावची फर्म असून त्यामध्ये होलसेल भांडी ...
सांगली फाटा येथे प्रवीण ताराचंद पारेख यांची पारेख मेटल व साई मेटल या नावची फर्म असून त्यामध्ये होलसेल भांडी विक्री तसेच जर्मन, पितळ, तांब्याची मोड घेण्याचा व्यवसाय आहे. त्यातील आरोपी गोंधळी हा गेल्या वर्षभरापासून पारेख यांच्या दुकानात पितळ, तांबे, जर्मनची मोड घेऊन वरचेवर येत होता. पारीख यांचा गोंधळीवर विश्वास असल्याने व नेहमीचे गिऱ्हाईक असल्याने ते गोंधळी याला व्यवसायासाठी आगाऊ रक्कम देत होते. सदरचे व्यवहार हे लाखाच्या पटीत होते. गोंधळीने जर्मन, पितळ, तांब्याची मोड स्क्रॅप आणून देतो, असे सांगून त्यासाठी पारीख यांच्याकडून वेळोवेळी बँक खात्यावरून १८ लाख रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करून घेतले तसेच रोख रक्कम २५ लाख रुपये, सांगली येथील एस. जे. ट्रेडर्स या कंपनीकडून ४५ लाख १४ हजार १५७ रुपयांचा माल घेऊन त्यापैकी पारीख यांना ३०,९९,३९४ रुपये किंमतीचा मोडीचा माल देऊन उर्वरित १४,१४,७६३ रुपये मालाचा अपहार केला, असे एकूण ५७ लाख १४ हजार ७६३ रुपये गोंधळी याने पारीख यांच्याकडून विश्वासाने घेतले. मात्र, त्या बदल्यात जर्मन, पितळ, तांब्याची मोड स्क्रॅप आणून दिलीच नाही. त्यामुळे पारीख यांनी गोंधळी याच्याविरोधात शिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.