गोपनीय पोलिसांचा बहाणा करून महिलेल्या ५७ हजाराला फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 12:38 PM2020-11-07T12:38:35+5:302020-11-07T12:41:21+5:30

Crime News, Police, kolhapur, crimenews अपघातील मृताचा विमा क्लेम काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करून  महिलेला  ५७ हजारांचा गंडा घालणाऱ्या तोतया पोलिसांच्या  विरोधात फसवणुकीचा  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही  घटना १७ जुलैला घडली होती.रात्री उशिरा गुुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

57 thousand women cheated under the pretext of confidential police | गोपनीय पोलिसांचा बहाणा करून महिलेल्या ५७ हजाराला फसवले

गोपनीय पोलिसांचा बहाणा करून महिलेल्या ५७ हजाराला फसवले

Next
ठळक मुद्देगोपनीय पोलिसांचा बहाणा करून महिलेल्या ५७ हजाराला फसवले तोतया पोलिसांच्या  विरोधात फसवणुकीचा  गुन्हा नोंद

पेठवडगाव :अपघातील मृताचा विमा क्लेम काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करून  महिलेला  ५७ हजारांचा गंडा घालणाऱ्या तोतया पोलिसांच्या  विरोधात फसवणुकीचा  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही  घटना १७ जुलैला घडली होती.रात्री उशिरा गुुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
 
याबाबत तानाजी पिलाजी सावंत (रा.तुकाई नगर,भादोले रोड, वडगाव) यांच्या विरोधात दुसर्यांदा फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत फिर्याद सुरेखा कृष्णात जाधव (रा.निलेवाडी ता.हातकणंगले) यांनी दिली आहे. तपास सहाय्यक फौजदार डी टी पोळ यांनी दिली आहे. सावंत यास पोलिसांनी अटक केली आहे. 
  
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेवाडी (ता. हातकणंगले ) येथील आशा स्वयंसेवका असणार्या सुरेखा जाधव यांच्या मुलीचा ऐतवडे खुर्द (ता.वाळवा)येथे विवाह झाला होता.दरम्यान त्यांचा जावाई संदीप सर्जेराव पाटील यांचा १९ मे ला अपघातात मृत्यू झाला होता.
दरम्यान तानाजी सावंत कामानिमित्त निलेवाडीला येत होता.या दरम्यान जाधव यांची सावंत बरोबर ओळख झाली.

या ओळखी दरम्यान त्याने वडगाव पोलिसा ठाण्यात गोपनीय पोलिस आहे.तरी तुमच्या जावयाचे अपघाती क्लेम मिळवुन देतो अशी बतावणी केली.या कामासाठी साठ हजार रुपये खर्च येणार असे सांगीतले.त्यानंतर त्याने याकामासाठी १७ जुलै ला निलेवाडीतील घरात येवुन ५७ हजार रुपये घेवून पसार झाला.त्यानंतर सावंत याने कागदपत्रे दिली नाहीत. तसेच टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे फसवणुकी झाल्याचे लक्षात आल्यामुळे पोलिसांत धाव घेतली.

याबाबत वडगाव पोलिस ठाण्यात या पुर्वी ही गुन्हा दाखल झाला आहे.या भामट्याबद्दल अनेक तक्रारी असून नागरीकांनी त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन प्रशिक्षीणार्थी अधिकारी डॉ.धीरज बच्चु यांनी केले आहे.

Web Title: 57 thousand women cheated under the pretext of confidential police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.