देवस्थानला ५८ कोटी देणार -- चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:05 AM2017-09-22T01:05:00+5:302017-09-22T01:05:30+5:30

कोल्हापूर : तुम्ही फक्त उपक्रम मांडा, चांगले काम करा, पैशांची काळजी करू नका, त्यासाठी शासन निधी देईलच;

58 crore to Devasthan - Chandrakant Dada Patil | देवस्थानला ५८ कोटी देणार -- चंद्रकांतदादा पाटील

देवस्थानला ५८ कोटी देणार -- चंद्रकांतदादा पाटील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : तुम्ही फक्त उपक्रम मांडा, चांगले काम करा, पैशांची काळजी करू नका, त्यासाठी शासन निधी देईलच; शिवाय समितीचे न्यायालयात अडकलेले ५८ कोटी रुपयेही आम्ही लवकरच मिळवून देऊ, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी दिले.

जिल्हा नियोजन समिती व देवस्थान समितीच्या दोन कोटींच्या निधीतून करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराला केलेल्या कायमस्वरूपी विद्युत रोषणाईचे घटस्थापनेच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. व्यासपीठावर महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, चंद्रदीप नरके, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, बी. एन. पाटील-मुगळीकर, प्रमोद पाटील, सचिव विजय पोवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव उपस्थित होत्या. यावेळी सुवर्णपालखी साकारल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचा देवस्थान समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अंबाबाई मंदिर विकासासाठी ७८ कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. त्यातून देवीदर्शनासाठी येणाºया परस्थ भाविकांसाठी सर्व सोयींनी युक्त असा भव्य दर्शन मंडप, व्हीनस कॉर्नर आणि टेंबलाईवाडी येथे भक्त निवास व पार्किंगची सोय असेल. जोतिबा मंदिराचाही २५ कोटींचा विकास आराखडा मंजूर झाला असून, त्या कामांच्याही निविदा काढण्यात येणार आहेत.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, विद्युत रोषणाईमुळे पर्यटकांचा ओघ वाढणार आहे. देवीच्या कृपेने कोल्हापुरात सुखसंपन्नता आहे. अन्य देवस्थानांप्रमाणे अंबाबाईसाठीही सुवर्णपालखी असावी, या इच्छेतून आम्ही सुवर्णपालखीचा संकल्प सोडला आणि भाविकांच्या सहकार्यातून २६ किलो सोन्याची पालखी साकारली. गुरुवारपासून या सुवर्णपालखीत अंबाबाईची मूर्ती विराजमान होऊन मंदिराला प्रदक्षिणा घालताना पाहणे हा सोहळा अवर्णनीय असेल.

शाहू छत्रपती यांनी अध्यक्षीय भाषणात अंबाबाई मंदिराचा सातत्याने विकास व्हावा. अन्य देवस्थानांप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने आदर्शवत काम करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविकात अध्यक्ष महेश जाधव यांनी समितीवर शासनाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवू, असा शब्द दिला. सदस्य शिवाजीराव जाधव यांनी आभार मानले.

शैलपुत्री अंबाबाई

 संम्मीलित रूप असून शाक्त तंत्रामध्ये शैलपुत्री ही मुलाधार चक्राची स्वामिनी मानली जाते.‘वंदे वंछित लाभाय चंद्रार्धकृतशेखराम’ असा या देवतेचा ध्यानमंत्र आहे. या देवीची मंदिरे क्वचितच पाहायला मिळतात. ही पूजा मयूर मुनीश्वर व मंदार मुनीश्वर यांनी बांधली.
दिवसभरात भावेकाका यांचे श्रीसूक्तपठण, आठ ते नऊ या वेळेत उषा रेवणकर यांचे ललिता सहस्रनाम स्तोत्रम, मुकुंद सोनटक्के, मेघा कराळे यांचे भजन, अमोल बुचडे यांचे भजन, धनश्री पाडगांवकर यांचे भजन, मनीषा कामटे यांचे भक्तिगीत गायन, प्रतिभा हसबनीस यांचे भजन, रमेश गुरव यांनी भजन सादर केले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी प्रास्ताविक केले. त्यात ते म्हणाले, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी अस्पृश्य, बहुजनांसाठी शिक्षणाची द्वारे उघडली. प्राथमिक शिक्षणावर आजही आपण इतका खर्च करत नाही. त्यांनी मोफत सक्तीचा प्राथमिक शिक्षण कायदा करून शेकडो वर्षांची विद्या बंदी तोडली. या कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहीर आझाद नायकवडी व त्यांच्या सहकाºयांनी शाहू गौरवगीत सादर केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी आभार मानले.


अंबाबाईच्या साडीनुसार रोषणाईचे रंग
या विद्युत रोषणाईच्या उद्घाटनानंतर मंदिराचे प्राचीन सौंदर्य खुलून दिसले. नवरात्रौत्सवात रोज अंबाबाईला परिधान करण्यात आलेली साडी ज्या रंगाची असेल, त्या रंगाची विद्युत रोषणाई केली जाणार आहे.
गोल्डन महाडिक
यावेळी शाहू छत्रपती यांनी खासदार महाडिक यांचा उल्लेख ‘गोल्डन महाडिक’ असा केला. नवरात्रौत्सवाचा पहिला रंग पिवळा असल्याने खासदार महाडिकांनी पिवळ्या रंगाचा झब्बा घातला होता. त्यांच्या पुढाकाराने अतिशय कमी कालावधीत साकारलेली सुवर्णपालखीदेखील सोनेरी रंगाची आहे; म्हणून मी त्यांचा असा उल्लेख केल्याचे शाहू छत्रपती यांनी सांगितले.

शैलपुत्री अंबाबाई
कोल्हापूर : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख पीठ असलेल्या करवीरनिवासिनी आदिमाता श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला घटस्थापनेच्या विधीने गुरुवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची नवदुर्गांमधील प्रथम दुर्गा शैलपुत्रीच्या रूपात बैठी सालंकृत पूजा बांधण्यात आली, तर जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीची खडी पूजा बांधण्यात आली.
गुरुवारी पहाटेच्या अभिषेकानंतर सकाळी साडेआठ वाजता शेखर मुनीश्वर कुटुंबीयांकडून अंबाबाईची घट स्थापना करण्यात आली. तोफेची सलामी झाली की ‘देवी बसली’ असे संबोधले जाते. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला. दुपारची आरती व शंखतीर्थानंतर अंबाबाईची शैलपुत्री रूपात बैठी सालंकृत पूजा बांधण्यात आली. दरम्यान, जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीची उत्सवमूर्ती करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या भेटीला आली.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा व मंत्रानुष्ठान करण्याची प्रथा शाक्त तंत्रामध्ये आहे. त्यानुसार नऊ दिवस दुर्गेची नऊ रूपे पूजली जातात. नवदुर्गांमधील प्रथम दुर्गा शैलपुत्री म्हणजे पार्वतीचेच एक रूप आहे. मस्तकावर अर्धचंद्र, वृषारूढ, हातात त्रिशूळ व कमळ असे देवीचे स्वरूप आहे. शैलपुत्री म्हणजे पर्वतराजाची पुत्री पार्वती. देवीचे स्वरूप शिवाशी एकरूप आहे म्हणूनच वाहन म्हणून बैल आयुध म्हणून त्रिशूळ आणि मस्तकी अर्धचंद्र ही शिवाची लक्षणे आहेत.

Web Title: 58 crore to Devasthan - Chandrakant Dada Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.