इचलकरंजीत ५८ पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:29+5:302021-07-19T04:17:29+5:30

इचलकरंजी : शहरात रविवारी विविध ३६ भागांतील ५८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू ...

58 positive patients in Ichalkaranji | इचलकरंजीत ५८ पॉझिटिव्ह रुग्ण

इचलकरंजीत ५८ पॉझिटिव्ह रुग्ण

Next

इचलकरंजी : शहरात रविवारी विविध ३६ भागांतील ५८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भोनेमाळ, जवाहरनगर प्रत्येकी ५, गावभाग, पुजारी मळा प्रत्येकी ४, आमराई मळा, आयजीएम हॉस्पिटलजवळ प्रत्येकी ३, सहकारनगर, स्टेशन रोड, बावणे गल्ली, शिवाजीनगर, प्रियदर्शनी कॉलनी प्रत्येकी २, शारदा सदन, खंजिरे मळा, अष्टविनायक कॉलनी, मंगळवार पेठ, लालनगर, सांगली रोड, बोहरा मार्केट, आसरानगर, सांगली नाका, राजराजेश्वरीनगर, कापड मार्केट, जाजू गारमेंटजवळ, आवाडेनगर, नाईक मळा, बंडगर माळ, नटराज चौक, घोडकेनगर, तीन बत्ती चार रस्ता चौक, ढवळे हॉस्पिटलजवळ, कोल्हापूर नाका, गणेशनगर, विठ्ठलनगर, कृष्णानगर, शहापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत आठ हजार ७९९ जणांना लागण झाली आहे. आठ हजार ४९ जण बरे झाले असून, ३६४ जण उपचार घेत आहेत. मृत्युसंख्या ३८६ वर स्थिर आहे.

Web Title: 58 positive patients in Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.