घोरपडे स्मारकासाठी मुश्रीफ यांच्याकडून ६ कोटी ७५ लाख मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:15 AM2021-06-30T04:15:45+5:302021-06-30T04:15:45+5:30

खोत पुढे म्हणाले, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी २०१२ ला स्मारक उभारण्याचा मनोदय केला होता. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात ...

6 crore 75 lakh sanctioned by Mushrif for Ghorpade memorial | घोरपडे स्मारकासाठी मुश्रीफ यांच्याकडून ६ कोटी ७५ लाख मंजूर

घोरपडे स्मारकासाठी मुश्रीफ यांच्याकडून ६ कोटी ७५ लाख मंजूर

Next

खोत पुढे म्हणाले, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी २०१२ ला स्मारक उभारण्याचा मनोदय केला होता. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात ५ कोटी १७ लाख निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी एक कोटी ७० लाख रुपयांचे काम पूर्णदेखील झाले. पण २०१४ ला भाजप सरकार आल्यानंतर सदर स्मारकाचे काम पूर्णपणे ठप्प झाले.

२०१९ ला महाविकास आघाडी सरकार आले. सदर कामाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला. स्मारकास निधी मिळण्यासाठी अनेक वेळा मुंबईत बैठका झाल्या; पण कोरोना आपत्तीमुळे निधी मिळण्यास अडचणी निर्माण होत होत्या. हसन मुश्रीफ यांना सदर कामासाठी ग्रामविकास विभागामार्फत निधी मंजूर करावयाचा होता, पण त्यात काही तांत्रिक अडचणी येत होत्या.

याबाबतीत वित्त विभागाचे मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक घेऊन आवश्यक त्या तांत्रिक बदलाबाबतच्या सर्व परवानग्या मिळवण्यात आल्या. नुकताच या स्मारक बांधकामास ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ग्रामविकास विभागामार्फत ६ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती शशिकांत खोत यांनी दिली.

फोटो : सेनापती कापशी (ता. कागल) येथील ग्राम तलावात निधीअभावी बांधकाम रखडलेले सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक. आता निधी उपलब्ध झाल्याने लवकरच स्मारकाच्या बांधकामास सुरुवात होणार आहे.

Web Title: 6 crore 75 lakh sanctioned by Mushrif for Ghorpade memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.