गडहिंग्लज पालिकेकडून ६ कोटींची करवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 11:52 AM2021-04-06T11:52:16+5:302021-04-06T11:53:36+5:30

Muncipal Corporation Gadhinglaj kolhapur- कोरोनाच्या संकटातही गडहिंग्लज शहरातील सुज्ञ नागरिकांनी नगरपालिकेच्या करवसुलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे गेल्यावर्षीच्या थकित करासह चालूवर्षीची मिळून सरासरी ९० टक्यांवर करवसुली झाली. शासकीय कर वजा जाता एकूण ६ कोटी १५ लाख ५१ हजार ७८० इतकी निव्वळ करवसुली झाली, अशी माहिती मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिली.

6 crore tax collection from Gadhinglaj Municipality | गडहिंग्लज पालिकेकडून ६ कोटींची करवसुली

गडहिंग्लज पालिकेकडून ६ कोटींची करवसुली

Next
ठळक मुद्देगडहिंग्लज पालिकेकडून ६ कोटींची करवसुली सरासरी ९० टक्के वसुली : कोरोनातही नागरिकांचे सहकार्य

गडहिंग्लज :कोरोनाच्या संकटातही गडहिंग्लज शहरातील सुज्ञ नागरिकांनी नगरपालिकेच्या करवसुलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे गेल्यावर्षीच्या थकित करासह चालूवर्षीची मिळून सरासरी ९० टक्यांवर करवसुली झाली. शासकीय कर वजा जाता एकूण ६ कोटी १५ लाख ५१ हजार ७८० इतकी निव्वळ करवसुली झाली, अशी माहिती मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिली.

मुतकेकर म्हणाले, घरपट्टी, शिक्षणकर, रोजगार हमी कर, विशेष स्वच्छता कर, वृक्षकर, अग्निशमन कर, घनकचरा संकलन शुल्क मिळून गेल्यावर्षीचा थकित ९७ लाख ५७ हजार ५३१ व चालूवर्षीचे ४ कोटी ९ लाख ५४ हजार ३९८ एकूण ५ कोटी ७ लाख ११ हजार ९२९ इतके वसुलीचे उद्दिष्ट होते.

निव्वळ वसुली योग्य ४ कोटी ९१ लाख २३ हजार ७७३ पैकी ४ कोटी ५७ लाख ८७ हजार ४१४ म्हणजे ९३.४२ टक्के इतकी वसुली झाली.
वाढीव हद्दीतील गतवर्षीचे थकित ३ लाख २४ हजार ३९५ आणि चालू वर्षीचे ४० लाख ३१ हजार ९५९ मिळून ४३ लाख ५६ हजार ३५४ इतके कर वसुलीचे उद्दिष्ट होते.

निव्वळ वसुली योग्य मागणीच्या ४३ लाख ४५ हजार ३११ पैकी ३८ लाख ७९ हजार ४३ रूपये म्हणजेच ८९.०४ टक्के इतकी करवसुली झाली.
याकामी नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्यासह सर्व नगरसेवक, लेखापाल शशीकांत मोहिते, करअधिक्षक भारती पाटील, कर सहाय्यक अवंती पाटील, निजानंद मिश्रकोटी, नरेंद्र कांबळे, संतोष घार्वे, भैरू कमते आदींसह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले, असेही मुतकेकर यांनी सांगितले.

 ९२ टक्के पाणीपट्टी वसूल

गेल्यावर्षीची थकित पाणीपट्टी ३४ लाख ४२ हजार १० रूपये व चालूवर्षीची ९५ लाख ७७ हजार १२० रूपये मिळून १ कोटी २९ लाख १९ हजार १३० इतकी पाणीपट्टी वसुली होती. त्यातील निव्वळ वसुली योग्य मागणीपैकी १ कोटी १८ लाख ८५ हजार ३२३ म्हणजेच ९१.९९ इतकी पाणीपट्टी वसुल झाली, असेही मुतकेकर यांनी सांगितले.
 

Web Title: 6 crore tax collection from Gadhinglaj Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.