जिल्ह्यात ६० टक्केच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:13 AM2017-09-18T01:13:35+5:302017-09-18T01:13:35+5:30

60 percent rain in the district | जिल्ह्यात ६० टक्केच पाऊस

जिल्ह्यात ६० टक्केच पाऊस

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६०.६२ टक्के पाऊस झाला असला तरी राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले तालुके मात्र ५० टक्क्यांच्या आतच राहिले आहेत. कागल तालुक्याने सरासरी ओलांडली असून, शाहूवाडी तालुका ९८ टक्क्यांवर आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. २0१५ साली पावसाने दगा दिल्याने शेतकºयांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. जिल्ह्यातील उसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली होती. उसाअभावी साखर कारखाने फेब्रुवारी महिन्यातच बंद झाले होते. मात्र गतवर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याचा चांगला साठा झाला होता. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्याच्या तयारीत असणाºया शेतकºयासमोर यंदा पुन्हा अपुºया पावसाने संकट उभे केले होते. काही अपवाद वगळता आॅगस्ट महिना कोरडाच गेला होता. त्यामुळे तर पिकांनी माना टाकल्या होत्या. तर ऊस लागणीसह रब्बीचा हंगाम वाया जाणार अशी भिती व्यक्त असताना सप्टेंबरच्या सुरुवातीपासून जिल्ह्णात पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली. त्यामुळे शेतकºयांना दिलास मिळाला. गेले आठ दिवस विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. पाऊस रोज हजेरी लावत असल्याने विहिरी, नद्यांची पातळी काहीप्रमाणात वाढली आहे. धरणेही भरली आहेत. हा पाऊस खरीप पिकांना पोषक असून ऊन-पावसामुळे उसााची वाढ जोमात सुरू आहे.
जिल्ह्यात सरासरी १७७२.३९ मिलिमीटर पाऊस पडतो; पण आतापर्यंत १०७४.४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकूण सरासरीच्या ६०.६२ टक्केच पाऊस पडला असून, हातकणंगले तालुक्यात ४४.९७ टक्के, राधानगरी तालुक्यात ४२.३० टक्के, गगनबावडा तालुक्यात अद्याप ४७.३६ टक्केच पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात पडणाºया पावसाच्या तुलनेत गगनबावडा तालुका एकदमच मागे राहिला असून, तिथे केवळ २० टक्केच पाऊस झाला आहे. भुदरगड, गडहिंग्लज, कागल या तालुक्यांनी सप्टेंबर महिन्याची सरासरी आताच ओलांडली आहे.
दरम्यान, रविवारी दुपारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्णात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रातही पाऊस आहे. त्यात जिल्ह्णातील सगळीच धरणे शंभर टक्के भरल्याने नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परिणामी नद्यांची पातळी स्थिर राहिली आहे. पंचगंगा नदीवरील रुई व इचलकरंजी हे दोन बंधारे अद्यापही पाण्याखाली असल्याने वाहतूक बंद आहे.
तालुका सरासरी पाऊस आतापर्यंत झालेला पाऊस
मिलिमीटर कंसात टक्केवारी
हातकणंगले ८२०.४० ३६८.९१ (४४.९७ )
शिरोळ ३८५.३० २६२.२१ (६८.०५)
पन्हाळा १४१६.२० १०३९.३१ (७३.३९)
शाहूवाडी १५४२.३० १५२१.०० (९८.६२)
राधानगरी ३५०१.६० १४८१.२८ (४२.३०)
गगनबावडा ५६२९.४० २६६६.०० (४७.३६)
करवीर ७९६.९० ५५२.३२ (६९.३१)
कागल ६४९.६० ७६२.९४ (११७.४५)
गडहिंग्लज ७८४.६० ५१८.७९ (६६.१२)
भुदरगड १३४३.७० १०७९.८० (८०.३६)
आजरा १७८९.७० १२१२.०० (६७.७२)
चंदगड २६०९.०० १४२९.०३ (५४.७७)

Web Title: 60 percent rain in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.