Kolhapur: राधानगरी धरणात ६० टक्के पाणीसाठा, पावसाचा जोर वाढल्यास जुलैअखेर धरण पूर्ण भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 02:12 PM2024-07-19T14:12:38+5:302024-07-19T14:12:57+5:30
राधानगरी : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, तालुक्यातील तिन्ही धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राधानगरी धरण ...
राधानगरी : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, तालुक्यातील तिन्ही धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राधानगरीधरण ६० टक्के भरले असून, पावसाचा जोर वाढल्यास जुलैअखेर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
काल दिवसभरात राधानगरीत धरण क्षेत्रात १३६ मिमी पावसाची नोंद झाली असून, राधानगरी धरणात ६०.८१ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. म्हणजेच ५०५८.०७ द.ल.घ.मी. पाणीसाठा असून ३२७.३५ फूट पाणी इतकी पातळी झाली आहे. तर दूधगंगा धरणात ४७ टक्के इतका पाणीसाठा असून, तुळशी जलाशय ५८.८५ टक्के भरले आहे.
राधानगरी धरणात जून महिन्यापासून ते १८ जुलैपर्यंत १८८६ मिमी पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी याच तारखेस १२४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. आज राधानगरी धरणातील वीज निर्मिती केंद्रातून १४०० क्युसेस विसर्ग भोगावती नदीपात्रात चालू असल्याने नदीपात्रात वाढ होत आहे.