इचलकरंजीत ६० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:17 AM2021-07-12T04:17:05+5:302021-07-12T04:17:05+5:30
इचलकरंजी : शहरात रविवारी विविध ३५ भागांतील ६० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित एकाही ...
इचलकरंजी : शहरात रविवारी विविध ३५ भागांतील ६० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.
रविवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये जवाहरनगर ९, शहापूर ७, गणेशनगर ४, मंगलमूर्ती टॉकीजजवळ, हुलगेश्वरी रोड प्रत्येकी ३, टाकवडे वेस, आमराई रोड, गुरूकन्नन नगर, इंडस्ट्रियल इस्टेटजवळ, बालाजी नगर प्रत्येकी २, गुजरी पेठ, सुतार मळा, मंगळवार पेठ, बोहरा मार्केट, शांती नगर, मथुरा नगर, इंदिरा नगर, सहकार नगर, बिग बझारजवळ, स्टेशन रोड, सांगली रोड, जुना सांगली नाका, आरगे मळा, वर्धमान चौक, मुक्त सैनिक सोसायटी, सर्वोदय नगर, सातपुते गल्ली, साखरपे हॉस्पिटलजवळ, बंडगर मळा, शाहू पुतळ्याजवळ, सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी, भोनेमाळ, विकास नगर, सोलगे मळा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत आठ हजार ५२९ जणांना लागण झाली असून, सात हजार ७३९ जण बरे झाले आहेत. सध्या ४०८ जण उपचार घेत असून, मृत्यूसंख्या ३८२वर स्थिर आहे.