आठ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ६० हजार दुकाने बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:24 AM2021-05-14T04:24:42+5:302021-05-14T04:24:42+5:30
गुढीपाडवा, अक्षय तृतीया, लग्नसराईमुळे व्यापाऱ्यांनी आपल्या आस्थापनांत आधीच माल भरून ठेवला आहे. आता लॉकडाऊनमुळे त्यांचे नुकसान झाले आहे. या ...
गुढीपाडवा, अक्षय तृतीया, लग्नसराईमुळे व्यापाऱ्यांनी आपल्या आस्थापनांत आधीच माल भरून ठेवला आहे. आता लॉकडाऊनमुळे त्यांचे नुकसान झाले आहे. या हंगामात एकूण ४० टक्के व्यवसाय होतो. गेल्यावर्षीही लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान झाले. सामाजिक बांधीलकी जपत व्यापारी, व्यावसायिक हे गरजूंना मदत करत आहेत. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिकांना उभारी देण्यासाठी त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोताप्रमाणे शासनाने अनुदान द्यावे. तीन महिन्यांतील कर्जाचे व्याज माफ व्हावे. पूर्ण वर्षाचा व्यवसाय कर माफ करावा. विजेचे दर कमी करावेत. सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत बँका सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, आदी मागण्या या निवेदनाद्वारे केल्या असल्याचे संजय शेटे यांनी सांगितले. यावेळी ‘कोल्हापूर चेंबर’चे माजी अध्यक्ष आनंद माने, सचिव धनंजय दुग्गे, आदी उपस्थित होते.
चौकट
दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प होणार
निवेदन दिल्यानंतर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन, किराणा भुसार व्यापारी असोसिएशन आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींची बैठक झाली. त्यामध्ये लॉकडाऊनला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील ६० हजार आस्थापना बंद राहणार आहेत. त्यामुळे सुमारे दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प होणार असल्याची माहिती संजय शेटे यांनी दिली.
फोटो (१३०५२०२१-कोल-चेंबर निवेदन) : कोल्हापुरात गुरुवारी व्यापारी, व्यावसायिकांच्या विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री सतेज पाटील यांना कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिले. यावेळी शेजारी आनंद माने, धनंजय दुग्गे उपस्थित होते.
===Photopath===
130521\13kol_6_13052021_5.jpg
===Caption===
फोटो (१३०५२०२१-कोल-चेंबर निवेदन) : कोल्हापुरात गुरूवारी व्यापारी, व्यावसायिकांच्या विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री सतेज पाटील यांना कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिले. यावेळी शेजारी आनंद माने, धनंजय दुग्गे उपस्थित होते.