गगनबावडा तालुक्यात ६०.५० मिमी पाऊस, अलमट्टीतून ५१७२ क्युसेक विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 06:08 PM2020-08-03T18:08:29+5:302020-08-03T18:12:24+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ६०.५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोयनेतून १०५० क्युसेक तर अलमट्टीतून ५१७२ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ६०.५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- ३.२५ एकूण २२१.३८ मिमी, शिरोळ- ०.२९ एकूण १९५.४३ मिमी, पन्हाळा- ११.२९ एकूण ६१५.२९मिमी, शाहूवाडी- १३.१७ एकूण ९०४.१७ मिमी, राधानगरी- १०.१७ एकूण ८९८.३३ मिमी, गगनबावडा- ६०.५० मिमी एकूण २४६७ मिमी, करवीर- ३.९१ एकूण ४६५.९१ मिमी, कागल- ४.८६ एकूण ६२३.१४ मिमी, गडहिंग्लज- १.८६ एकूण ४५४.४३ मिमी, भुदरगड- ८.६० एकूण ७४८.२० मिमी, आजरा- १७ एकूण १०१५ मिमी, चंदगड- १७ मिमी एकूण ९४५.३३ मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
कोयनेतून १०५० क्युसेक तर अलमट्टीतून ५१७२ क्युसेक विसर्ग
जिल्ह्यातील राधानगरी धरणात १६१.७० दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयनेतून १०५० तर अलमट्टी धरणातून ५१७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात ५२.५२ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ९०.८५४ इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा
तुळशी ५६.१७ दलघमी, वारणा ६५५.७५ दलघमी, दूधगंगा ४८२.२९ दलघमी, कासारी ५२.८१ दलघमी, कडवी ४०.५९ दलघमी, कुंभी ५३.५३ दलघमी, पाटगाव ७०.३९ दलघमी, चिकोत्रा २३.०२
बंधाऱ्यांची पाणी पातळी
राजाराम ११ फूट, सुर्वे १२.२ फूट, रुई ३९.१ फूट, इचलकरंजी ३५ फूट, तेरवाड ३४ फूट, शिरोळ २६ फूट, नृसिंहवाडी २१ फूट, राजापूर ९.९ फूट तर नजीकच्या सांगली ३.३ फूट व अंकली ३.७ फूट अशी आहे.