पट्टणकोडोलीत ६१ लाखांची कामे, ही तर सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:50 AM2020-12-11T04:50:49+5:302020-12-11T04:50:49+5:30
पट्टणकोडोली : पट्टणकोडोलीच्या नागरिकांनी निवडणुकीत मला भरघोस मतदान देऊन विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांची उतराई म्हणून या गावच्या ...
पट्टणकोडोली : पट्टणकोडोलीच्या नागरिकांनी निवडणुकीत मला भरघोस मतदान देऊन विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांची उतराई म्हणून या गावच्या विकासासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. ६१ लाखांची कामे ही सुरुवात असून, भविष्यातही निधी कमी पडणार नाही, असे प्रतिपादन आमदार राजू आवळे यांनी केले. पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे आमदार फंडातून मंजूर झालेल्या रस्त्याच्या प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संजय गांधी निराधार योजनेतून मंजूर झालेल्या प्रस्तावांचा आदेश वाटप कार्यक्रम आमदार राजू आवळे यांच्या हस्ते करण्यात आला.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर पहिल्याच वर्षी आमदार राजू आवळे यांनी गावासाठी ६१ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. यामध्ये न्यू एसटी स्टँड ते हुपरे नगर रस्त्यासाठी २८ लाख, लोहार गल्ली ते बंदूबाई मंदिर रस्त्यासाठी ८ लाख, चावडी गल्ली ते जिल्हा परिषद शाळा रस्त्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हा परिषद सदस्या वंदना मगदूम, तालुका पंचायत समिती सदस्य अरुण माळी, सरपंच विजया जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख साताप्पा भवान, प्रकाश जाधव, विजय रजपूत, प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच कृष्णाजी मसुरकर यांनी केले.
फोटो ओळ : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे आमदार फंडातून मंजूर रस्त्याचा प्रारंभ आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आला.
१० पट्टणकोडोली नावाने