ऊसतोड मुकादमांकडून चार जिल्ह्यांत ६१ कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2016 11:39 PM2016-10-18T23:39:20+5:302016-10-18T23:39:20+5:30

संघटनेची माहिती : आर्थिक नुकसानीमुळे अनेक वाहनमालकांच्या आत्महत्या --कारनामे मुकादमांचे

61 million in four districts of the district | ऊसतोड मुकादमांकडून चार जिल्ह्यांत ६१ कोटींचा गंडा

ऊसतोड मुकादमांकडून चार जिल्ह्यांत ६१ कोटींचा गंडा

Next

प्रकाश पाटील -- कोपार्डे --ऊसतोड मजूर पुरवठा करतो असे सांगत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे या पाच जिल्ह्यांतील एक हजार वाहनमालकांकडून लाखो रुपये घेऊन प्रत्यक्ष हंगामात दडी मारत मुकादमांनी गेल्या दहा वर्षांत ६१ कोटींना गंडा घातल्याची अधिकृत आकडेवारी वाहनमालक संघटनेकडे आहे; पण याहीपेक्षा फसवणुकीचा आकडा मोठा असून, तो १०० कोटींच्यावर असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कुमटाळे यांनी दिली.
राज्यात साखर कारखानदारीत काम करणाऱ्या सर्वच घटकांना काहींना काही प्रमाणात संरक्षण आहे; मात्र वाहनमालकांना कोणतेच संरक्षण नसल्याचे चित्र समोर आले आहे. सध्या राज्यात साखर कारखान्यांचा हंगाम तोंडावर आहे. यासाठी लागणारी तोडणी वाहतूक यंत्रणा वाहनमालकांच्या जिवावरच उभारली जाते. या व्यवसायात शेतकरीच मोठ्या प्रमाणात असून, आपल्या मालकीची शेती सांभाळत चार पैसे मिळविणारा धंदा म्हणून याकडे बेरोजगार शेतकरी युवक मोठ्या प्रमाणात वळला. मात्र, ऊसतोड मजूर मिळविताना वाहनमालक व ऊसतोड मजूर यांच्यामधील दुवा असणाऱ्या मुकादमांनी बरोबर फायदा उठवत वाहनमालक व ऊसतोड मजुरांना गंडा घालण्यास सुरुवात केली. मात्र, याची सर्वाधिक झळ वाहनमालकांना बसल्याचे पुढे आले असून गेल्या दहा वर्षांत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील एक हजार ४० वाहनमालकांना ऊसतोड मजूर टोळ्या पुरविणाऱ्या मुकादमांनी ६१ कोटी रुपयांना गंडा घातला आहे.
हा आकडा पश्चिम महाराष्ट्र ऊस वाहतूक ट्रक-ट्रॅक्टर मालक संघटनेकडे नोंद केलेल्या ऊस वाहतूक वाहनमालक संघटनेकडील अधिकृत आहे; पण ज्यांची फसवणूक होऊनही आपल्याला कारखाना, शासन व न्याय व्यवस्था यांच्याकडून न्यायच मिळणार नाही, अशी समजूत झालेल्यांनी गप्प बसणेच पसंत केल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कुमटाळे यांनी सांगितले. मात्र, ही फसवणूक किमान २०० कोटींच्या वर असल्याचा दावाही केला.


गेल्या दहा वर्षांत राज्यातील चार जिल्ह्यांत ऊस वाहतूक वाहनमालकांना गंडा घातलेली आमच्याकडे नोंद झालेली आकडेवारी म्हणजे पाण्यात तरंगणाऱ्या बर्फासारखा भाग आहे. मात्र, हा आकडा फार मोठा असून आम्हाला कोणतेच संरक्षण नाही. ऊसतोड मुकादमांना आम्ही दिलेल्या पैशांची कायदेशीर कागदपत्रे आमच्याकडे असूनही न्यायालयात आम्हाला न्याय मिळेना. फसवणूक केल्याबद्दल पोलिस गुन्हा नोंद करून घेईनात व कारखानदार आमचा संबंध नाही म्हणून तुमचे तुम्ही बघा म्हणून हात वर करीत असल्याने मोठी आर्थिक लूट झाली. मला स्वत:ला मुकादमाने १७ लाखांचा गंडा घातला आहे. - राजेंद्र कुमटाळे


आत्महत्या केलेले वाहनमालक
गेल्या दहा वर्षांत ऊसतोड मजूर मुकादमांनी फसवणूक केलेल्या वाहनमालकांनी आत्महत्या केली. संघटनेकडे नोंद असलेली नावे-कोल्हापूर जिल्हा : संजय मोतिराम पाटील (रा. भादोले), बाबासो चौगले (रा. टाकवडे), शामराव राऊत (रा. राजाभळी), हिंदुराव पाटील (व्हनगुत्ती), शिवाजी पाटील (सैनिक टाकळी), छोटू मेस्त्री (भोगावती).
सांगली जिल्हा : इलाही इस्माईल सय्यद (आष्टा), बाबूराव भूपाल मुळेकर (लिंगनूर), भरत ताटे (धोंडेवाडी, सोलापूर).

Web Title: 61 million in four districts of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.