जिल्ह्यातील ६१९ प्राथमिक शाळा अवघड क्षेत्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:23+5:302021-06-18T04:17:23+5:30
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये महत्त्वाचा मुद्दा असलेल्या अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांचे आकडे गुरुवारी ...

जिल्ह्यातील ६१९ प्राथमिक शाळा अवघड क्षेत्रात
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये महत्त्वाचा मुद्दा असलेल्या अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांचे आकडे गुरुवारी निश्चित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हजर झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्यासह आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, परिवहन, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधी यांची समिती सभागृहात बैठक झाली. ग्रामविकास विभागाने ठरवून दिलेल्या सातपैकी तीन निकषांच्या पूर्ततेनंतर अवघड क्षेत्रातील शाळा ठरवण्यात आल्या आहेत.
अवघड शाळा ठरवताना संवादछाया हा एक निकष आहे. त्यासाठी बीएसएनएलकडून माहिती मिळाली आहे. परंतु याबाबत सर्वच मोबाइल कंपन्यांकडून माहिती मागवावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
तालुका अवघड क्षेत्र शाळा सर्वसाधारण क्षेत्र शाळा
१ आजरा ४४ ७७
२ भुदरगड ८४ ७७
३ चंदगड ८४ ११६
४ गडहिंग्लज ०४ १२४
५ गगनबावडा ७० ००
६ हातकणंगले ०० १७८
७ कागल २० १०१
८ करवीर १८ १६०
९ पन्हाळा २४ १७०
१० राधानगरी १०५ १०१
११ शाहूवाडी १६६ १०२
१२ शिरोळ ० १५३
एकूण ६१९ १३५९