सरूड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ६२ लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:02+5:302021-06-04T04:19:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सरूड : सरूड प्राथमिक आरोग्य केंद्रातील सोयी सुविधेसाठी जिल्हा परिषदच्या फंडातून ६२ लाखांचा निधी मंजूर करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सरूड : सरूड प्राथमिक आरोग्य केंद्रातील सोयी सुविधेसाठी जिल्हा परिषदच्या फंडातून ६२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती हंबीरराव पाटील यांनी दिली.
सरुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत पाटील यांनी ही माहीती दिली. ते म्हणाले या मंजूर निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्राचे विस्तारीकरण, मीटिंग हॉल संरक्षक भिंत, (एकत्रित निधी ५० लाख) वैद्यकीय अधिकारी निवास्थान दुरुस्ती (९ लाख) पेव्हिंग ब्लॉक (३ लाख) आदी कामे मार्गी लागणार आहेत. सरुड प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या गावातील कोरोना बाधित रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन करून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. कोविड १९ चे सरूड गावात समाधानकारक लसीकरण झाले नसल्याचे सांगत यापुढे उपलब्ध होणा-या लसीतून सरुड गावातील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.
यावेळी डॉ. प्रशांत जगताप, आरोग्य सहायक बी. जी. साठे, औषधनिर्माता जे. बी. घोसाळकर यांनी कोरोना काळातील कामकाजाची माहिती दिली.
याप्रसंगी उपसरपंच भगवान नांगरे, ग्रा. पं. सदस्य रामदास व्हावळे, संजय गुरव, रवींद्र आपटे, आरोग्यसेवक संजय पाटील, युवराज जाधव, विनायक पाटील आदीसह सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.