६४ माजी संचालकांवर जबाबदारी निश्चित होणार

By admin | Published: November 19, 2014 10:55 PM2014-11-19T22:55:42+5:302014-11-19T23:18:55+5:30

कोल्हापूर बाजार समिती : लवाद नेमण्याची प्रक्रिया सुरू

64 former directors will be responsible for the responsibility | ६४ माजी संचालकांवर जबाबदारी निश्चित होणार

६४ माजी संचालकांवर जबाबदारी निश्चित होणार

Next

राजाराम लोंढे - कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या ६४ माजी संचालकांच्या कारभारामुळे समितीच्या झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. माजी संचालकांना नोटिसा व त्यांवरील त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आर्थिक नुकसान निश्चित करण्यासाठी लवादाची नेमणूक येत्या आठ-दहा दिवसांत केली जाणार असून, तेच संबंधित माजी संचालक व अधिकाऱ्यांवर नुकसानीची जबाबदारी निश्चित करणार आहेत.
बाजार समितीचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार वर्षभरापूर्वी विरोधी संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. त्यानुसार सहा वर्षांतील कामकाजाच्या चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती; तोपर्यंत तत्कालीन संचालकांनी गेल्या पंचवीस वर्षांच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी केली. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी रंजन लाखे यांच्यामार्फत १९८७ च्या कारभाराची चौकशी केली. यामध्ये अनेक निर्णय बेकायदेशीर घेऊन समितीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका चौकशी अधिकारी रंजन लाखे यांनी ठेवला होता. यासह भूखंड वाटप, नोकरभरती या कारणांनी संचालक मंडळाच्या बरखास्तीची कारवाई केली होती. समितीच्या झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी बरखास्त संचालकांना नोटिसा लागू केल्या होत्या. त्यानुसार संचालकांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता लवाद नेमून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. किती नुकसान झाले हे चौकशी अहवालात नमूद केलेले आहे.

Web Title: 64 former directors will be responsible for the responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.