शिरोळ तालुक्यात नवे ६४ रुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:25 AM2021-04-24T04:25:09+5:302021-04-24T04:25:09+5:30
शिरोळ तालुक्यात शुक्रवारी नव्या ६४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये जयसिंगपूर शहरात २०, तर शिरोळमधील ९ जणांचा समावेश ...
शिरोळ तालुक्यात शुक्रवारी नव्या ६४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये जयसिंगपूर शहरात २०, तर शिरोळमधील ९ जणांचा समावेश आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
तालुक्यात आतापर्यंत ३३० रुग्णसंख्या झाली आहे. जयसिंगपूर, शिरोळ, उदगाव या गावांत मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. जयसिंगपूर शहरात शुक्रवारी यशवंत हौसिंग सोसायटी-२ ,शाहूनगर-२ ,स्वप्ननगरी-१, गल्ली क्र.१६-३, गल्ली क्र.१५-३, गल्ली १३-२, गल्ली क्र.९-३ गल्ली क्र. ८-२, गल्ली क्र.५-३, गल्ली क्र.३-१, गल्ली क्र.१-१, असा समावेश आहे, तर तालुक्यातील उदगाव-१२, शिरोळ-९, यड्राव-८, शिरटी-२, आगर १, कुरुंदवाड-३, कोंडिग्रे-२, घालवाड-१ निमशिरगाव-१, कवठेसार-१ चिपरी-१, चिंचवाड-२ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रशासनाने नियम कडक केले आहेत, तरीदेखील विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही.