व्हेंटिलेटरसह आयसीयूसाठी ६५०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:54+5:302021-06-05T04:18:54+5:30

कोल्हापूर : कोविड रुग्ण व नातेवाईकांची खासगी रुग्णालयांमधून होणारी लुबाडणूक टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या दराची सूची शुक्रवारी प्रसिद्ध ...

6500 for ICU with ventilator | व्हेंटिलेटरसह आयसीयूसाठी ६५०० रुपये

व्हेंटिलेटरसह आयसीयूसाठी ६५०० रुपये

Next

कोल्हापूर : कोविड रुग्ण व नातेवाईकांची खासगी रुग्णालयांमधून होणारी लुबाडणूक टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या दराची सूची शुक्रवारी प्रसिद्ध केली. कोल्हापूर शहर व गांधीनगरसाठी वेगळे दर असून उर्वरीत शहरासाठी वेगळे दर देण्यात आले आहेत, त्यापुढे जावून खासगी रुग्णालयांना दर लावता येणार नाही, त्यामुळे बिलात एकवाक्यता येईल. तसेच खासगी रुग्णालयांच्या मनमानीलासुद्धा चाप बसणार आहे.

खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांवर भरमसाठ बिल आकारले जात आहे, यामुळे होत असलेली लूट टाळण्यासाठी मंगळवारी राज्य शासनाने या रुग्णालयांतील बेडचे दर निश्चित केले आहेत. यात शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून कोल्हापूरचा समावेश ब वर्ग शहरामध्ये होतो. त्यानुसार शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने बेडच्या दराची सूची जाहीर केली आहे.

अनेक खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवरील उपचारासाठी भरमसाठ बिल आकारले जात आहेत. बिलांच्या तपासणीसाठी ऑडिटरची नियुक्ती करण्यात आली असली तरी बेडचे दर निश्चित नसल्याने रुग्ण व नातेवाईकांची मोठी लूट होत होती. आता मात्र या ठरलेल्या दरापेक्षा जास्त बिल आकारता येणार नाही. मात्र यात मोठ्या तपासण्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.

----

बेड : कोल्हापूर शहर व गांधीनगरसाठी दर : ग्रामीण भागासाठीचे दर

जनरल वॉर्ड व विलगीकरण : ३००० : २ हजार ४००

आयसीयू : ५ हजार ५०० : ४ हजार ५००

आयसीयू विथ व्हेंटिलेटर : ६ हजार ७०० : ५ हजार ४००

---

आरोग्य संस्था व कर्मचाऱ्यांना मुदतवाढ

जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील रुग्णालयांच्या खाटांसह तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व ऑक्सिजन प्रणाली व वैद्यकीय सेवेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या रुग्णालयांमध्ये ९ हजार ७४३ खाटा असून त्यापैकी ७ हजार ९९६ खाटांसह वैद्यकीय उपचाराशी निगडित तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व इतर अत्यावश्यक प्रणालीच्या वापरासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

--

Web Title: 6500 for ICU with ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.