पन्हाळा मतदारसंघासाठी ६६ कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:22 AM2021-03-15T04:22:06+5:302021-03-15T04:22:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर : नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातील रस्त्यांसाठी सुमारे ६५ कोटी ९२ लाख रुपयांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणानगर : नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातील रस्त्यांसाठी सुमारे ६५ कोटी ९२ लाख रुपयांची मंजुरी मिळाल्याची माहिती आ. डॉ. विनय कोरे यांनी दिली.
कोल्हापूर-रत्नागिरी या मुख्य मार्गावर असणाऱ्या केर्ली-कोतोली-नांदगाव-नांदारी या मुख्य राज्यमार्ग सुधारणा करणे (४५ कोटी ४६ लाख रुपये), केर्ली-वाडी रत्नागिरी-जोतिबा-गिरोली रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे (१ कोटी ५० लाख रुपये), तसेच केर्ली-वाडी रत्नागिरी-जोतिबा रस्ता सुधारणा करणे (३ कोटी रुपये), डोणोली-चरण-थेरगाव-सावर्डे-सातवे-कोडोली सुधारणा व रुंदीकरण करणे (२ कोटी ५० लाख रुपये)
डोणोली-चरण थेरगाव सावर्डे- सातवे-कोडोली सुधारणा, रुंदीकरण व आर.सी.सी. गटर्स करणे (१ कोटी रुपये)
कोडोली-ऐतवडे रस्त्यावर लहान पूल बांधणे ५९ लाख ४८ हजार रुपये, निगवे-कुशिरे-पोहाळे-गिरोली- केखले रस्त्यावर लहान पूल बांधणे- (६१ लाख ६३ हजार रुपये) वाघबीळ - बोरपाडळे- वारणानगर-वाठार रस्त्याचे रुंदीकरण करणे (१ कोटी २५ लाख रुपये), सोनुर्ले (ता.शाहूवाडी) लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या विकासासाठी १० कोटी रुपये, अशी ६५ कोटी ९२ लाख रुपयांची मंजुरी मिळाली असल्याचेही आ. कोरे यांनी सांगितले -
फोटो-