कृषिपंपाच्या वीज बिल थकबाकीमुक्तीसाठी ६६ टक्क्यांची सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:25 AM2021-08-29T04:25:09+5:302021-08-29T04:25:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीज बिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी जुन्या थकबाकीमध्ये तब्बल ६६ ...

66% discount for arrears of electricity bills of agricultural pumps | कृषिपंपाच्या वीज बिल थकबाकीमुक्तीसाठी ६६ टक्क्यांची सूट

कृषिपंपाच्या वीज बिल थकबाकीमुक्तीसाठी ६६ टक्क्यांची सूट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीज बिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी जुन्या थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. शिल्लक थकबाकीपैकी ५० टक्के थकबाकी येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येत आहे. सद्यस्थितीत महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय खालावली आहे. त्यामुळे थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नाही व चालू वीज बिलांचा भरणा नाही अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कटू कारवाई करण्यात येत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील ७८ हजार ८०८ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकीपोटी ७२ कोटी ६१ लाख व चालू वीज बिलांच्या ४० कोटी ५३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट असे एकूण ८९ कोटी ६ लाख रुपये माफ झाले आहेत. यामध्ये ५५ हजार १४३ शेतकरी वीज बिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीज बिलासह थकबाकीच्या ५० टक्के रकमेचे एकूण ७५ कोटी ७५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी ५८ कोटी ६१ लाख रुपयांची सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.

गेल्या मार्चपासून महावितरणने कृषिपंप वीज धोरण २०२० च्या अंमलबजावणीला सुरुवात केली. या धोरणातील योजनेप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १ लाख ४५ हजार ४६२ शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे. निर्लेखनाद्वारे महावितरणकडून मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी रक्कम वगळून या शेतकऱ्यांकडे ४११ कोटी १५ लाख सुधारित थकबाकी आहे. यातील ५० टक्के थकबाकी तसेच चालू वीज बिलांचे १०२ कोटी ९२ लाख रुपयांचा भरणा येत्या मार्च २०२२ पर्यंत केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के रक्कम देखील माफ होणार आहे.

Web Title: 66% discount for arrears of electricity bills of agricultural pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.