जिल्ह्यातील ६७ अट्टल गुन्हेगार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2017 12:32 AM2017-02-09T00:32:23+5:302017-02-09T00:32:23+5:30

कुंडली तयार : दोन वर्षांसाठी पोलिसांकडून कारवाई

67 illegal criminals in the district | जिल्ह्यातील ६७ अट्टल गुन्हेगार तडीपार

जिल्ह्यातील ६७ अट्टल गुन्हेगार तडीपार

Next



कोल्हापूर : जिल्ह्यातील नागरिकांच्या जिवाचे व मालमत्तेचे रक्षण करणे हे पोलिसांचे काम आहे. दरोडा, जबरी चोरी, चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, लूटमार, आदी गुन्ह्यांना चाप बसवा, यासाठी जिल्ह्यातील ६७ अट्टल सराईत गुन्हेगारांची ‘कुंडली’ तयार केली आहे. या सर्वांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यांतून तडीपार केले जाणार आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी हा निर्णय घेतला.
जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, लूटमारीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नागरिकांची सुरक्षाही अशा घटनांमुळे धोक्यात आली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हेगारांची चेहरा-ओळख व्हावी, त्यांच्यावर कोणत्या प्रकारे कारवाई करता येईल, यासंबंधी आठ दिवसांपूर्वी पोलिस मुख्यालयात बैठक झाली होती. या गुन्हेगारांचे रेकॉर्ड तयार करून ‘मोक्का’ व तडीपारीची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या गुन्हेगारांची ‘कुंडली’ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विभागाने काढली. यापूर्वी गणेशोत्सव, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना तडीपार केले जात होते. या सर्वांवर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) व ५५/५६/५७ (अ)(ब) अन्वये दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
यांच्यावर कारवाई
जुना राजवाडा - कविराज हेमंत नाईक (वय ३०, रा. देवकर पाणंद), उमेश बाळासो साळोखे (३१, रा. फुलेवाडी जुना नाका), राहुल अर्जुन पवार (२८, रा. हडको कॉलनी, कळंबा), रोशन विजय राणे (२३, रा. तपोवन शाळेजवळ कळंबा), रणजित महिपती पाटील (३२), तेजस राजू वाघमारे (२५, दोघे रा. लक्षतीर्थ वसाहत), अमर श्रीशैल सरगौंड (२२, रा. महादेव मंदिर, राजोपाध्येनगर)
लक्ष्मीपुरी -सद्गुरू गोवर्धन निगवेकर (वय ३३, रा. गंगावेश), किशोर हणमंत माने (२६, रा. जोशी गल्ली, कोल्हापूर), यासीन मौला बागवान (२४, रा. लक्षतीर्थ वसाहत). शाहूपुरी- धीरज रमेश वालावलकर (२३, रा. शिवाजी पार्क झोपडपट्टी), रसूल अन्वर सय्यद (२३, रा. शाहू कॉलेज, विचारे माळ), अक्षय दत्तात्रय बुजरे (२२, रा. शाहूपुरी ५ वी गल्ली),
राजारामपुरी - मुजमिल खुदबुद्दीन कुरणे (२६, रा. यादवनगर), हसन रफिक शेख (२२, दोघे रा. यादवनगर), नितीन दीपक अभंगे (२६), शंकर शामराव भास्कर (४५, दोघे रा. जवाहरनगर), सचिन शिवाजी आगलावे (२०, रा. शाहू कॉलनी, विक्रमनगर), करवीर- सुहास कृष्णात कोर्इंगडे (२४), संदीप विलास कदम (२६, दोघे रा. कळंबा, ता. करवीर), मानसिंग महादेव सुतार (२४, रा. कंदलगांव, ता. करवीर), संग्राम रघुनाथ लोहार (२१, रा. वाकरे, ता. करवीर), प्रकाश अर्जुन तडाखे (२२, रा. शिंगणापूर, ता. करवीर).
गांधीनगर - सचिन हणमंत नागणे (३२, रा. वसगडे, ता. करवीर), लखन परशराम कांबळे (२४, रा. वळिवडे रोड, गांधीनगर), शिरोली एमआयडीसी - सुनील अरुण हेगडे (२३), संजय राजाराम सातपुते (३६), रोहित दत्तात्रय जाधव (२४, सर्व रा. रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले). गोकुळ शिरगाव - जयपाल शंकर कांबळे (३२), विजय शंकर कांबळे (३२, दोघे रा. तामगांव, ता. करवीर), शकील नजीर सय्यद (२५, रा. कोगील बुद्रुक, ता. करवीर), नारायण कल्लाप्पा भोगन (३०, रा. कणेरीवाडी, ता. करवीर). मुरगूड - गणेश भैरवनाथ भोसले (२५, रा. शाहूनगर, मुरगूड, ता. करवीर),
राधानगरी - नवनाथ जयसिंग शिरसाट (२४), प्रल्हाद लहू वाणी (२५, दोघे. रा. सावर्डे पाटणकर, ता. राधानगरी), सरदार रामचंद्र मोरे (२२, रा. कोनवडे, ता. भुदरगड).
गडहिंग्लज- विजय शिवाजी नडगिरी (३०, रा. कुडची नगर, इचलकरंजी), अजय कमलाकर आसोदे (२४, रा. गडहिंग्लज, सध्या रा. पुणे).
आजरा- मानसिंग अशोक कुंभार (२६, रा. कुंभार गल्ली, आजरा), मनोज ऊर्फ महेश बाबूराव शेंडगे (२४, रा. विटे, ता. आजरा), प्रकाश केरबा होन्याळकर (२५, रा. बुरूडे, ता. आजरा), निशांत नारायण सुतार (२४, रा. मसोली, ता. आजरा).
गुन्हे शाखा, इचलकरंजी- मुनीर ऊर्फ मुन्ना मेहबूब मोमीन (२८, रा. आसरा नगर, इचलकरंजी), विनायक ऊर्फ बंडू विनय कुंभार (२५, रा. साजणी, ता. हातकणंगले), स्वप्निल धोंडिराम बिरंजे (२५, रा. संगमनगर, तारदाळ, ता. हातकणंगले), सागर भास्कर सपाटे (२२, रा. भोनेमाळ-इचलकरंजी), राजू ऊर्फ सूरज सौदागर भोरे (३०, रा. आंबेडकर पुतळा, इचलकरंजी), अरविंद विजय कोरवी (२४, रा. जवाहर नगर, इचलकरंजी) शिवाजीनगर - प्रमोद संजय जाधव (२०, रा. जवाहरनगर, इचलकरंजी), निखिल अर्जुन दुधाणे (१९, रा. बंडगर माळ, इचलकरंजी), मस्जिद अल्लाबक्ष मुल्ला (३३, रा. माळभाग, कबनूर-इचलकरंजी), नीलेश नरेश कांबळे (२३, रा. कामगार चाळ, इचलकरंजी), उमेश सिकंदर राठोड (१९, रा. जवाहर नगर, इचलकरंजी), धनाजी राजाराम खुडे (२०, रा. कबनूर, ता. हातकणंगले). गावभाग-इचलकरंजी- गणेश शंकर मुल्ला (२५, रा. बालाजी कॉलनी, इचलकरंजी), मोहब्बत ऊर्फ मेहबूब अल्लाऊद्दीन नदाफ (२८, रा. संगमनगर, तारदाळ, ता. हातकणंगले), रफिक सलीम मुल्ला (२९, रा. सरवडे, ता. राधानगरी, सध्या रा. खोतवाडी, ता. हातकणंगले). शहापूर- रोहन रमेश निकम (२०), मनोज राजू कदम (२४), प्रशांत बाबासो महापुरे (२०, तिघे, रा. कोरोची, ता. हातकणंगले), योगेश बाळासो जगदाणे (२१, रा. गणेशनगर, इचलकरंजी). हुपरी- अनिल धोंडिराम बुचडे (३९), सुहास पांडुरंग मिरजकर (३१ दोघे रा. हुपरी, ता. हातकणंगले), रणजित आनंदा बिरांजे (२९, रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले).
हातकणंगले-श्रीधर धोंडिबा कुराडे (२६), युवराज आप्पासो शिंदे (२६, दोघे रा. गुरू कनान नगर, इचलकरंजी). वडगांव- सागर जयवंत कदम (२९, रा. तळसंदे, ता. हातकणंगले), नितीन हरी निकाडे (२३, रा. खोची, ता. हातकणंगले), अभिजित मोहन पोवार (२४), सचिन सुरेश पाटील (२३ दोघे रा. खोची, ता. हातकणंगले). शिरोळ-शाहू सुकुमार कोळी (२५), सुनील अशोक कोळी (२५), संदीप धोंडिराम कोळी (२२, तिघे रा. शिरोळ). जयसिंगपूर- मुन्ना अब्दुल नदाफ (४२, रा. उदगांव, ता. शिरोळ), बंडू पांडुरंग भिसे (३८, रा. दानोळी, ता. शिरोळ), अजित रघुनाथ पडियार (२५, दोघे रा. सुकुमार उमाजी गोसावी (२३, रा. राजीव गांधी नगर, जयसिंगपूर).

Web Title: 67 illegal criminals in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.