भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दुपारपर्यंत ६७ टक्के मतदान

By राजाराम लोंढे | Published: November 19, 2023 03:00 PM2023-11-19T15:00:01+5:302023-11-19T15:00:49+5:30

राधानगरी तालुक्यातील कोदवडे येथील केंद्रावर उच्चांकी ९७ टक्के मतदान झाले.

67 percent polling till noon for bhogavati sugar factory elections | भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दुपारपर्यंत ६७ टक्के मतदान

भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दुपारपर्यंत ६७ टक्के मतदान

कोल्हापूर : परिते ( ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दु. २: ३० पर्यत सरासरी ६७ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रामध्ये मतदानकेंद्रामध्ये मतदानासाठी तुरळक गर्दी होती. सकाळी १० नंतर मतदानकेंद्रावर गर्दी झाली. राधानगरी तालुक्यातील कोदवडे येथील केंद्रावर उच्चांकी ९७ टक्के मतदान झाले.

भोगावती कारखान्याच्या निवडणुकीसाठी राधानगरी तालुक्यातील घोटवडे, गुडाळ, राशिवडे, कसबा तारळे, कंंथेवाडी, येळवडे तर करवीरमधील हसुर दु, सडोली खा, कोथळी, बेले, म्हाळुंगे या मतदानकेंद्रावर सरासरी साठ ते पासष्ट टक्के मतदान झाले. केंद्रात मतदानासाठी तीन ते चार टेबल असल्याने मतदान प्रक्रीया गतीने होत होती. राधानगरी तालुक्यातील कोदवडे गावामध्ये ९६ टक्के मतदान झाले. सतारुढ आघाडीचे आमदार पी.एन.पाटील व संपतराव पवार यांनी सडोली केंद्रावर, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळेंनी  घोटवडे येथे तर विरोधी परिवर्तन आघाडीचे हंबीरराव पाटील यांनी हळदी,सदाशिवराव चरापले, कौलवकर पँनेलचे धैर्यशील पाटील यांनी कौलव केंद्रावर मतदान केले. मतदान प्रक्रीया शांततेत सुरु आहे.

Web Title: 67 percent polling till noon for bhogavati sugar factory elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.