६८ हजार लोकांची क्षयरोग, कुष्ठरोग तपासणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:49 AM2020-12-05T04:49:01+5:302020-12-05T04:49:01+5:30

कोल्हापूर : कोविड सर्वेक्षण संपते न संपते तोच महापालिका आरोग्य विभागाने शहरात क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण रुग्ण शोधमोहीम हाती घेतली. ...

68,000 people will be tested for tuberculosis and leprosy | ६८ हजार लोकांची क्षयरोग, कुष्ठरोग तपासणी होणार

६८ हजार लोकांची क्षयरोग, कुष्ठरोग तपासणी होणार

Next

कोल्हापूर : कोविड सर्वेक्षण संपते न संपते तोच महापालिका आरोग्य विभागाने शहरात क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण रुग्ण शोधमोहीम हाती घेतली. ही शोधमोहीम ३१ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार असून एक लाख ६८ हजार ३८८ लोकांची तपासणी केली जाईल.

शहरातील लोकसंख्येच्या तीस टक्के लोकांची म्हणजे एक लाख ६८ हजार ३८८ इतक्या लोकांची तपासणी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आशा स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवकांची ११८ पथके तयार करण्यात आली आहेत. सदर पथकांचे सनियंत्रण नागरी आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी करणार आहेत. मोहिमेंतर्गत संशयित क्षयरुग्णांसाठी मोफत क्ष-किरण तपासणीची सुविधा सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

जनतेने घाबरून न जाता क्षयरोग किंवा कुष्ठरोगाची लक्षणे असल्यास घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या आरोग्याविषयी अचूक माहिती देऊन मोफत तपासणी करून घ्यावी. तपासणीअंती क्षयरोगाचे निदान झाल्यास एक्स-रे, सीबीनॅट व इतर आवश्यक तपासण्या आणि औषधोपचार संपूर्णपणे मोफत केले जाणार आहेत. नागरिकांनी सहकार्य करून क्षयरोग मुक्त कोल्हापूर मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन उपायुक्त निखिल मोरे यांनी केले.

शहरात सुरू करण्यात आली असून या मोहिमेचा शुभारंभ आज नागरी आरोग्य केंद्र क्रमांक ३ राजारामपुरी येथे उपायुक्त निखिल मोरे यांच्याहस्ते व आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी प्रशासन वैद्यकीय अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र फाळके, डॉ. शोभा दाभाडे, आरोग्य पर्यवेक्षक नागपूरकर व क्षयरोग व कुष्ठरोग विभागाकडील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: 68,000 people will be tested for tuberculosis and leprosy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.