जिल्हा परिषदेचे ६९ टक्के कर्मचारी ‘व्याधिग्रस्त’
By admin | Published: June 27, 2016 12:09 AM2016-06-27T00:09:57+5:302016-06-27T00:37:57+5:30
आरोग्य तपासणी अभियानातून स्पष्ट : हृदयरोग, मधुमेह, व्यायामाच्या अभावाचा परिणाम
यशोमती ठाकूर गरजल्या : पिंगळा नदीचे खोलीकरण
तिवसा : मागील पाच वर्षांत जी विकासकामे झाली, ती जनतेसमोरच आहेत त्याचा पुरावा देण्याची गरज नाही. तसेच विकासकामात खोडा घालणे व श्रेय लाटण्याची आमची संस्कृती नाही तर विकास कामांसाठी यापुढेही कटीबद्ध आहे, असे रोखठोक प्रतिपादन आमदार यशोमती ठाकूर यांनी केले. त्या तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या पिंगळा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलत होत्या.
आमदार यशोमती ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या की, येथील पिंगळा नदीच्या खोलीकरण व रुंदीकरण या कामासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागला ही वस्तुस्थिती आहे. तसेच यापूर्वी असलेल्या लोकप्रतिनिधींच्या विकासकामात कधीच अडचणी नाहीत किंवा श्रेय लाटण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. विकासकामात राजकारण करणे ही काँग्रेस पक्षाची परंपरा नाही. परंतु ज्यांना जे करायचे नेत्यांनी करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. याप्रसंगी सरपंच श्रीकृष्ण बांते, एन.जी. उर्फ भय्यासाहेब ठाकूर, विजय जाजू, नामदेव डरांगे, जितेंद्र ठाकूर, दिलीप वानखडे, विठ्ठल म्हसकी, अमोल पन्नासे, गणे कळमकर, सुनील भारती, राजेश थोरात, मंगेश राऊत, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता श्रीरसागर, दुर्गा म्हसकी, पवार यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)