ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३ हजार ३०७ जागांसाठी ७ हजार ६५७ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 10:38 AM2021-01-05T10:38:10+5:302021-01-05T10:40:29+5:30

gram panchayat Elecation Kolhapur- कोल्हापूर जिल्हयात  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७ हजार ६५७ उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत ४७ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुक झाली असून सायंकाळपर्यंत प्रतिस्पर्धांनी माघार घ्यावी यासाठी उमेदवारांकडून जोरकस प्रयत्न सुरु होते. सोमवारी सायंकाळपर्यंत ७ हजार ४० उमेदवारांनी माघार घेतली. तसेच चिन्हांचे वाटप करण्यात आले. आता निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाल्याने मंगळवारपासून गावागात प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

7 thousand 657 candidates are in the fray for 3 thousand 307 seats for Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३ हजार ३०७ जागांसाठी ७ हजार ६५७ उमेदवार रिंगणात

कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीअंतर्गत सोमवारी माघारीचा अंतिम दिवस व चिन्ह वाटप होते. यानिमित्त कृषी विद्यापीठ येथे उमेदवारांनी व समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३ हजार ३०७ जागांसाठी ७ हजार ६५७ उमेदवार रिंगणात१५ जानेवारीला मतदान : ७ हजार ४० जणांची माघार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयात  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७ हजार ६५७ उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत ४७ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुक झाली असून सायंकाळपर्यंत प्रतिस्पर्धांनी माघार घ्यावी यासाठी उमेदवारांकडून जोरकस प्रयत्न सुरु होते. सोमवारी सायंकाळपर्यंत ७ हजार ४० उमेदवारांनी माघार घेतली. तसेच चिन्हांचे वाटप करण्यात आले. आता निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाल्याने मंगळवारपासून गावागात प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

कोल्हापुर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ४३३ ग्रामपंचायतींची निवडणुक प्रक्रिया सध्या सुरु पुढील दहा दिवस आता गावागावात प्रचाराचा धुरळा उडणार असून १५ जानेवारीला मतदान आहे. १८ तारखेला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरु झाली आहे. ३० तारखेपर्यंत अर्ज स्विकारण्याची मुदत होती. या कालावधीत १५ हजार ८३० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

३१ डिसेंबरला झालेल्या छाननीत १८३ अर्ज अवैध ठरले तर काही जणांनी दुबार अर्ज भरले होते. उमेदवारीसाठी वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या १५ हजार ४१७ इतकी होती. त्यापैकी जवळपास ५० टक्के उमेदवारांनी माघार घेतली आहे.

आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून गावागावात स्थानिक राजकारण, गटातटाचे राजकारण सुरु झाले आहे. काही ठिकाणी महाविकास आघाडीने एकत्र निवडणुक लढवत आहे. तर काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी अशा पक्षांमध्येच निवडणूक होत आहे.

निवडणुक होवू घातलेल्या ग्रामपंचायती : ४३३ , पैकी ४७ बिनविरोध .

  • निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती : ३८६
  • एकूण प्रभाग संख्या : १ हजार ४९१
  • बिनविरोध प्रभाग १४६
  • एकूण सदस्य संख्या : ४ हजार २७
  • बिनविरोध सदस्य संख्या ७२०
  • रिंगणातील उमेदवारांची संख्या : ७ हजार ६५७
     

सर्वाधीक उमेदवार असलेल्या टॉपच्या तीन ग्रामपंचायती

  • कागल : १ हजार ४९
  • करवीर : १ हजार १७०
  • शिरोळ : ९९४

 

Web Title: 7 thousand 657 candidates are in the fray for 3 thousand 307 seats for Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.