‘गोकुळ’साठी ७० हरकती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:30 AM2021-02-25T04:30:59+5:302021-02-25T04:30:59+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) प्रारूप यादीवर ७० हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये मयत प्रतिनिधींच्या ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) प्रारूप यादीवर ७० हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये मयत प्रतिनिधींच्या नावावरील ठराव बदलणेसह इतर ४१ हरकती सहायक निबंधक (दुग्ध) विभागाकडे आलेल्या आहेत.
‘गोकुळ’च्या संलग्न संस्थांनी प्रतिनिधींच्या नावाने दाखल केलेल्या ठरावानुसार दुग्ध विभागाने प्रारूप यादी प्रसिद्ध केली होती. त्यावर हरकती घेण्यासाठी बुधवार (दि. २४)पर्यंत मुदत होती. या कालावधीत ७० हरकती दुग्ध विभागाकडे दाखल झाल्या आहेत. यामध्ये मयत ठरावधारकांचे नाव बदलणेबाबत २९ ठराव, नावात बदल करण्यासाठी १४ अशा हरकती आल्या आहेत.
सुनावणीची प्रक्रियाही स्थगित
राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगित केली आहे. त्यामुळे २ ते ४ मार्चला प्रारूप यादीवरील सुनावणीही घेता येणार नाही.
अशा आल्या हरकती-
मयत प्रतिनिधीचे नाव बदलणे - २९
नावात बदल करणे - १४
जुने दुबार ठराव - ३
यादीत नाव समाविष्ट करणे - १०
ठराव रद्द करणे- ३
ठराव बदलणे - ११