७१ हजार खाती अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:27 AM2018-02-15T00:27:17+5:302018-02-15T00:27:22+5:30

71 thousand accounts ineligible | ७१ हजार खाती अपात्र

७१ हजार खाती अपात्र

Next


कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीतील १ लाख ९५ हजार खात्यांच्या विसंगत यादीत तब्बल ७१ हजार खाती अपात्र ठरली आहेत. सर्वाधिक ९ हजार ९६२ खाती करवीर तालुक्यातील असून त्यापाठोपाठ हातकणंगले, कागल व राधानगरी तालुक्यांचा क्रमांक लागतो.
कर्जमाफीच्या पात्र याद्यांतील घोळानंतर गेल्या दीड महिन्यात पात्र खातेदारांची एकही यादी आयटी विभागाने जिल्हास्तरावर पाठविलेली नाही. उलट खात्यातील तफावत असलेल्या याद्या तालुकास्तरीय समितीकडे पाठवून त्यातील पात्र नावे पाठविण्याचे आदेश आयटी विभागाने दिले होते.
त्यानुसार सहकार विभाग, जिल्हा बॅँक व तालुकास्तरीय समितीचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ३८ हजार तफावत असणाºया शेतकºयांची यादी पाठविली होती. त्यानंतर ८७ हजार शेतकºयांची यादी आली.
आतापर्यंत १ लाख २५ हजार ९८८ शेतकºयांच्या १ लाख ९५ हजार १२३ खात्यांची तफावत यादीच्या पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामध्ये १ लाख २२ हजार ८१ खाती पात्र ठरली आहेत तर ७१ हजार १७१ खाती अपात्र ठरल्याने त्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. कर्जमाफीच्या निकषात न बसलेली, प्रस्तावात चुकीची माहिती भरलेले शेतकरी अपात्र ठरले आहेत.
शेतकºयांना फटका
एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ मध्ये उचल केलेले व याच आर्थिक वर्षात त्याची परतफेड केलेल्या शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ दिला आहे. जिल्ह्णात ९० टक्के शेतकरी ऊस उत्पादक असल्याने ते जूननंतरच कर्जाची उचल करतात. त्यामुळे जून २०१५ मध्ये उचल केलेल्या शेतकºयाने जून २०१६ पर्यंत परतफेड केली, पण कर्जमाफीच्या आर्थिक वर्षात ते बसत नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी अपात्र ठरले आहेत.
२२ हजारांची ‘ग्रीन लिस्ट’ आज?
राज्य सरकारच्या आयटी विभागाकडे पाठवलेल्या सव्वा लाख पात्र खात्यांपैकी आज, गुरुवारी २२ हजार खात्यांची ‘ग्रीन लिस्ट’ येण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय पात्र-अपात्र खातेदार

तालुका शेतकरी एकूण खाती पात्र अपात्र प्रलंबित
आजरा ५५०३ ९८६९ ४०८५ ५४७५ ३०९
गगनबावडा ३१२३ ४०३२ २२१२ १८१९ १
भुदरगड ६५९१ ९८५५ ५५ ३२ ३७३३ ५९०
चंदगड ६९८८ १३८३५ ९२६४ ४५६७ ४
गडहिंग्लज ७३८० १३९३९ ८३५५ ५५८१ ३
हातकणंगले १२६३७ १९५५४ ११३९४ ७८७४ २८६
कागल १२६८२ १५२१२ ७७२६ ७४६३ २३
करवीर २३४८५ ४३३४० ३३४२५ ९९६२ ०
पन्हाळा १३४७० १७२१७ ९२३८ ७३२९ ६५०
राधानगरी १२८५५ २३७५४ १६८३३ ६८८३ ३८
शाहूवाडी ५१५१ ८२५५ ४४१९ ३८२७ ९
शिरोळ १९१२३ १६२६१ ९५९८ ६६५८ ५

Web Title: 71 thousand accounts ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.