कोल्हापुरी गुळाचा ‘गोडवा’ वाढणार आवकेत ७१ हजार रव्यांची वाढ; दरही तेजीत राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 12:00 AM2018-11-08T00:00:42+5:302018-11-08T00:03:49+5:30
उसाचे घटलेले उत्पादन आणि वाढलेल्या एफआरपीमुळे यंदा गुळाचा ‘गोडवा’ वाढणार हे निश्चित आहे. सध्या हंगामाने गती घेतली नसली, तरी सरासरी प्रतिक्विंटल ३७५० रुपये दर आहे.
राजाराम लोंढे ।
कोल्हापूर : उसाचे घटलेले उत्पादन आणि वाढलेल्या एफआरपीमुळे यंदा गुळाचा ‘गोडवा’ वाढणार हे निश्चित आहे. सध्या हंगामाने गती घेतली नसली, तरी सरासरी प्रतिक्विंटल ३७५० रुपये दर आहे. गुजरात बाजारपेठेचा अंदाज घेता आगामी दोन-तीन महिन्यांत यामध्ये किमान दोनशे रुपयांची वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
‘कोल्हापुरी गूळ’ हा कोल्हापूरच्या ओळखीतील प्रमुख आहे. चव व कणीदार गुळाने साऱ्या जगाला भुरळ घातली आहे. येथील जमिनीतच कसदारपणा असल्याने गुळाला वेगळीच चव येते. जिल्'ात दीड हजार गुºहाळघरे होती, पण अनिश्चित दर, साखर कारखान्यांची वाढलेली संख्या आणि उसाच्या वाढत गेलेल्या दरामुळे शेतकरी गूळ निर्मितीपासून थोडे दूर जाऊ लागले आहेत.
गेल्या वर्षी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत २२ लाख गूळ रव्यांची आवक झाली होती. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २ लाख ८६ हजार ७२ रव्यांची आवक झाली होती. त्यावेळी सरासरी प्रतिक्विंटल ३६०० रुपये दर राहिला होता. यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच ३ लाख ५७ हजार रव्यांची आवक झाली.
यामध्ये पावसाळ्यात कर्नाटकातील गुळाची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यात घटस्थापनेच्या अगोदरपासून गुºहाळे सुरू आहेत; त्यामुळे आवकेत वाढ झाली आहे. यंदा आवक वाढली असली, तरी दरही चांगला मिळत आहे. चांगल्या प्रतीच्या गुळाला साडेचार हजार रुपयांपर्यंत दर आहे. यंदा साखरेचा किमान दर २९ रुपये केला, उसाचे उत्पादन कमी असल्याने त्याचा परिणाम गूळ दरावर होणार आहे. गुजरात बाजारपेठेचा अंदाज घेता, यंदा दोनशे रुपये जादा दर मिळण्याची शक्यता आहे.
‘अवकाळी’चा अडथळा कमी
गतवर्षीच्या तुलनेत आॅक्टोबरपासून परतीचा व अवकाळी पाऊस यंदा कमी आहे. दोन-तीन दिवसांचा अपवाद वगळता पाऊस झालाच नसल्याने गुºहाळ घरांना अडथळा आला नाही. याचा परिणामही आवक वाढण्यात झाला आहे.
तरच ऊस गुºहाळघराकडे
साधारणत: कोल्हापुरातील उसाचे वाण पाहता दोन टन उसाचे गाळप केल्यानंतर २६० किलो गूळ तयार होतो. आताचा सरासरी ३६०० रुपये दर कायम राहिला तर या गुळाचे ९३६० रुपये होतात. त्यातून गुळाचा उत्पादन खर्च २५०० रुपये वजा जाता ६८६० रुपये (दोन टन ऊस गाळप करून) शिल्लक राहतात. यंदा कारखान्यांची सरासरी २९०० रुपये एफआरपी आहे; त्यामुळे गुळाचा दर ३६०० रुपये कायम राहिला तरच शेतकरी गुºहाळघराकडे वळणार आहे.
यंदा उसाचे उत्पादन कमी आणि कारखान्यांच्या वाढलेल्या एफआरपीमुळे गुळाचा दर चांगला राहील. गुळाची आवक कमी झाली, तरी सरासरी दरात वाढ राहू शकते. - मोहन सालपे
(सचिव, बाजार समिती)
कोल्हापुरी गुळाला नेहमीच मागणी चांगली राहते. साखरेच्या दराचा परिणाम गूळ दरावर होतो, त्यामुळे यंदा मार्केट चांगले राहील असे वाटते.
- बाळासाहेब मनाडे (गूळ व्यापारी)