हातकणंगले मतदारसंघातील रस्ते, पुलांसाठी ७१.१८ कोटी : धैर्यशील माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:47 AM2021-03-13T04:47:04+5:302021-03-13T04:47:04+5:30

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या व पुलांच्या कामासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ७१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात ...

71.18 crore for roads and bridges in Hatkanangle constituency: be patient | हातकणंगले मतदारसंघातील रस्ते, पुलांसाठी ७१.१८ कोटी : धैर्यशील माने

हातकणंगले मतदारसंघातील रस्ते, पुलांसाठी ७१.१८ कोटी : धैर्यशील माने

Next

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या व पुलांच्या कामासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ७१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. पन्हाळा तालुक्यातील कोतोली, नांदगाव, नांदारी रस्त्यासाठी एडीबी निधीमधून ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी, शिरदवाड, शिवनाकवाडी रस्ता तीन कोटी, रुई फाटा ते रुई तळंदगे रस्ता दोन कोटी ५० लाख, वडगाव- लाटवडे रस्ता दोन कोटी ५० लाख, रुई फाटा ते रुई रस्ता दोन कोटी, विकासवाडी, हलसवडे, सांगवडे, पट्टणकोडोली, इंगळी रस्त्याच्या बाजूने आरसीसी गटार बांधणे ७० लाख, पट्टणकोडोली हुपरी, रेंदाळ, जंगमवाडी रस्त्याच्या बाजूने आरसीसी गटार बांधणे ८० लाख, तळंदगे ते कसबा सांगाव रस्त्यावरती लहान पूल बांधणे ८५ लाख, इंगळी ते दत्तमंदिर रस्त्यावरती लहान पूल बांधणे ६२ लाख, पन्हाळा तालुक्यातील कोतोली ते तिरपण, दिगवडे, पुनाळ, कळे रस्ता तीन कोटी ५० लाख, निगवे कुशिरे पोहाळे, गिरोली, केखले रस्त्यावरती लहान पूल बांधणे ६२ लाख, कोडोली, ऐतवडे रस्त्यावर लहान पूल बांधणे ५९ लाख, केर्ली, वाडीरत्नागिरी, जोतिबा, गिरोली रस्ता चार कोटी ५० लाखांचा समावेश आहे.

वाळवा तालुक्यातील बागणी ते दुधगाव रस्त्यांसाठी चार कोटी असे एकूण ७१ कोटी १८ लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे.

Web Title: 71.18 crore for roads and bridges in Hatkanangle constituency: be patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.