नवे रुग्ण ७१७, मृत्यू ३५, डिस्चार्ज ५५६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:27 AM2021-04-28T04:27:44+5:302021-04-28T04:27:44+5:30
कोल्हापूर : गेले काही दिवस मृतांचा वाढणारा आकडा मंगळवारीही कायम राहिला. गेल्या २४ तासांमध्ये ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू ...
कोल्हापूर : गेले काही दिवस मृतांचा वाढणारा आकडा मंगळवारीही कायम राहिला. गेल्या २४ तासांमध्ये ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अन्य जिल्ह्यांतील आठ रुग्णांचा समावेश आहे. नवे ७१७ कोरोना रुग्ण नोंदविण्यात आले असून, ५५६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मोठ्या संख्येने नागरिक बरे होऊन घरी परतत असल्याने हा एक दिलासा मानला जातो.
कोल्हापूर महापालिका क्षेत्रामध्ये सर्वाधिक म्हणजे १८३, त्याखालोखाल हातकणंगले तालुक्यात ९६, तर करवीर तालुक्यात ८० रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरामध्ये १७६९ जणांची तपासणी करण्यात आली असून, २४७३ जणांचे स्राव घेण्यात आले आहेत. १५७९ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे, तर ७८७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इतर जिल्ह्यांतील आठ, तर कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यात प्रत्येकी सातजणांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
मृतांमध्ये कोल्हापुरातील सातजण
गेल्या २४ तासांत झालेल्या ३५ मृत्यूंपैकी सातजण कोल्हापूर शहरातील, तर आठजण अन्य जिल्ह्यांतील आहेत.
कोल्हापूर ०७
राजारामपुरी, मंगळवार पेठ, फुलेवाडी, डी वॉर्ड, कळंबा जेल, शिवाजी पार्क, एस.एस.सी बोर्ड
करवीर ०७
शिंगणापूर, आटके, गोकुळ शिरगाव, नेर्ली तामगाव, निगवे दुमाला, उजळाईवाडी, कणेरी
हातकणंगले ०५
नवे पारगाव येथील दोन, शाहूनगर, माळभाग, हातकणंगले, जुना चंदूर रोड, कबनूर
इचलकरंजी ०२
शिरोळ मृत्यू ०१
दत्तवाड
गडहिंग्लज मृत्यू ०१
कुंबळहाळ
पन्हाळा ०२
तेलवे, नावली
भुदरगड ०१
कडगाव
शाहूवाडी ०१
हिंगणवाडी
इतर जिल्हे ०८
कऱ्हाड, इंदापूर, इस्लामपूर, सुकवडी पलूस, पाटेगाव (जि. पालघर), मोरेवाडी (ता. देवगड), पाटव (ता. मंगळवेढा), वाटेगाव (जि. सांगली)