महापलिकेत ७३ कोटींचा घरफाळा झोल :भूपाल शेटे ,लेखापरीक्षणात स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 12:09 PM2020-11-09T12:09:16+5:302020-11-09T12:10:46+5:30

munciplatycarporation, kolhapurnews कोल्हापूर महापालिकेचा सन २००४ ते २०११ या कार्यकालामध्ये घरफाळ्याचे ७३ कोटी ३३ लाख रुपये कमी जमा झाली आहे. तत्कालिन मुख्य लेखापरीक्षक प्रकाश कोळेकर यांचे घरफाळा लेखापरीक्षण अहवालात ही माहिती उघड झाली आहे. अहवालाप्रमाणे तत्कालिन प्रभारी करनिर्धारक संजय भोसले यांना त्वरित निलंबन व फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

73 crore house tax in NMC: Bhupal Shete, clear in the audit | महापलिकेत ७३ कोटींचा घरफाळा झोल :भूपाल शेटे ,लेखापरीक्षणात स्पष्ट

महापलिकेत ७३ कोटींचा घरफाळा झोल :भूपाल शेटे ,लेखापरीक्षणात स्पष्ट

Next
ठळक मुद्दे महापलिकेत ७३ कोटींचा घरफाळा झोल :भूपाल शेटे ,लेखापरीक्षणात स्पष्टतत्कालिन करनिर्धारक संजय भोसले यांच्यावर कारवाईची मागणी

कोल्हापूर : महापालिकेचा सन २००४ ते २०११ या कार्यकालामध्ये घरफाळ्याचे ७३ कोटी ३३ लाख रुपये कमी जमा झाली आहे. तत्कालिन मुख्य लेखापरीक्षक प्रकाश कोळेकर यांचे घरफाळा लेखापरीक्षण अहवालात ही माहिती उघड झाली आहे. अहवालाप्रमाणे तत्कालिन प्रभारी करनिर्धारक संजय भोसले यांना त्वरित निलंबन व फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

यामध्ये म्हटले आहे की, लेखापरीक्षक कोळेकर यांनी सन २००४ ते २०११ चे संपूर्ण घरफाळ्याचे लेखापरीक्षण करण्यासाठी भाडे करार, करआकारणी तक्ता, रिव्हिजनचे असेसमेंट फॉर्म, घरफाळा जमा रकमेची बिले, पावत्या, चालू मागणी डिमांड, थकबाकीची नोटीस, मागील थकबाकी आदी माहिती त्वरित पुरवावी यासाठी एकूण ४ पत्रे करनिर्धारक संजय भोसले यांना दिली. परंतु त्यांनी लेखापरीक्षण पथकास माहिती उपलब्ध करून दिली नाही.

कोळेकर व लेखापरीक्षण पथक १ जून २०११ रोजी घरफाळा विभागाच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांची माहिती घेऊन त्यांनी या संपूर्ण घरफाळ्याचा अहवाल तयार केला. तत्कालिन आयुक्त व स्थायी समिती यांना अहवाल दिला. त्यामध्ये त्यांनी त्रुटी दाखविल्या आहेत. असे असतानाही प्रशासनाने सन २०१२ ते २०२० या कालावधीचे लेखापरीक्षण केलेले नाही.

कोळेकर अहवाल

संजय भोसले यांनी घरफाळ्याचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. घरफाळ्याची जमा रक्कम किती, थकबाकी किती याची माहिती मिळत नाही. कित्येक थकबाकीच्या रक्कमा या रजिस्टरमधून फाडून टाकलेल्या आहेत. पुढील बिलात कोणतीही थकबाकी दिसत नाही. बांधकाम परवानगीनुसार घरफाळा आकारणी केलेली नाही, दैनंदिन जमा कीर्दवर अधिकाऱ्यांची तपासणी जमा रकमेसोबत सही नाही.

Web Title: 73 crore house tax in NMC: Bhupal Shete, clear in the audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.