Crime News-स्टोअरमधून ७३ हजाराचा मोबाइल चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 06:50 PM2021-03-13T18:50:25+5:302021-03-13T18:51:11+5:30

CrimeNews Kolhapur- कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरीतील रिलायन्स डिजिटल स्टोअर्स या शोरुममधून चोरट्याने सुमारे ७३ हजार ५९४ रुपये किमतीचा मोबाइल काउंटरवरून नजर चुकवून चोरी केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

73,000 mobile phone stolen from store | Crime News-स्टोअरमधून ७३ हजाराचा मोबाइल चोरी

Crime News-स्टोअरमधून ७३ हजाराचा मोबाइल चोरी

Next
ठळक मुद्देस्टोअरमधून ७३ हजाराचा मोबाइल चोरीशहरातून तीन दुचाकींची चोरी

कोल्हापूर : येथील लक्ष्मीपुरीतील रिलायन्स डिजिटल स्टोअर्स या शोरुममधून चोरट्याने सुमारे ७३ हजार ५९४ रुपये किमतीचा मोबाइल काउंटरवरून नजर चुकवून चोरी केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

याबाबत दुकानमालक सागर गणपती पवार (वय ३० रा. मराठा कॉलनी, कसबा बावडा) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सीसी टिव्ही फुटेजनुसार चोरटा अंदाजे ३० वय, अंगात भगव्या रंगाचा शर्ट, जीन्स पॅट असल्याचीही माहिती पवार यांनी पोलिसांना दिली.

शहरातून तीन दुचाकींची चोरी

कोल्हापूर शहरातील विविध तीन ठिकाणांहून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या. जय अशोक पटेल (वय २८ रा. शांती निवास बी.डब्लू. डी. अपार्टमेंट, टाकाळा) यांनी आपल्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केलेली सुमारे ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने चोरुन नेली.

आयटीआय कॉर्नरनजीक उभी केलेली २५ हजार रुपये किमतीची दुचाकी गुरुवारी रात्री अज्ञाताने चोरली, दुचाकीमालक अनुकूल अरुण सुतार (वय ३० रा. फुलेवाडी नाका) यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली. कसबा बावडा येथे विवेक शंकर पवार (रा. माळी गल्ली, पूर्वबाजू, कसबा बावडा) यांनी दारात उभी केलेली लाख रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने चोरली. तिन्हीही तक्रारींची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

बुलेटची दुचाकीस्वाराला धडक

 खाटांगळे ते आमशी मार्गावर ॲकॅडमीसमोर भरधाव बुलेटस्वाराने पाठीमागून धडक दिल्याने ज्ञानदेव बाजीराव शिपेकर (वय २५ रा. बोलोली ता. करवीर) हे दुचाकीस्वार जखमी झाले. अपघातानंतर बुलेटस्वार अपघाताची वर्दी न देता पळून गेला. याबाबत जखमी दुचाकीस्वाराला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर करवीर पोलीस ठाण्यात बुलेटस्वारावर गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: 73,000 mobile phone stolen from store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.